कणेरीवाडीत दहा गावठी हातभट्ट्यांवर छापे

कणेरीवाडीत दहा गावठी हातभट्ट्यांवर छापे

फोटो 94976

दहा गावठी हातभट्ट्यांवर कणेरीवाडीत छापे

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः कणेरीवाडी (ता. करवीर) परिसरात साईनगर, कंजारभाट वस्तीतील दहा गावठी हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज पहाटे छापा टाकला. ५४०० लिटर कच्चे रसायन, ५०० लिटर पक्के रसायन, २३० लिटर गावठी दारू असा २ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दहा जणांविरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रोहित दीपक घारूंगे, सनी सरवर बाटुंगे, अर्जुन रमेश घारूंगे, संदीप दीपक घारूंगे, जगदीश सुरेश बाटुंगे, राकेश सुरेश बाटुंगे याच्यासह चार महिला अशा दहा जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिस कारवाई झाल्याचे समजताच एकच धावपळ उडाली. पोलिसांच्या हाती लागलेला कच्चा माल जागेवरच नष्ट केला. कारवाईत पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक संदीप जाधव, खंडेराव कोळी, संजय पडवळ, संजय हुंबे, प्रकाश पाटील, नवनाथ कदम, रोहित मर्दाने, सारिका मोटे यांनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com