सकाळ वृक्षारोपण

सकाळ वृक्षारोपण

Published on

95004

‘सकाळ’, ‘एव्हनिंग ग्रुप’तर्फे
पाचगावला वृक्षारोपण

कोल्हापूर, ता. ५ ः सकाळ माध्यम समूह व एव्हनिंग ग्रुप, पाचगाव रोड यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुलाबनगर, वक्रतुंड कॉलनी, पाचगाव रोड या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वड, पेरू, लिंबू, चिकू ही देशी झाडे लावली. हा परिसर हिरवागार करण्यासोबतच तसेच ही झाडे जागवण्यासाठी प्रत्येकाने झाडांची जबाबदारी घेण्याचा निश्चय केला. शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचेही यावेळी ठरले.
यावेळी ग्रुपचे सदस्य चंद्रकांत रेमानीचे, सदाशिव पाटील, पवन यादव, सुरेंद्र अहिर, दिलीप पाडळकर, सुरेश सरनोबत, प्रा. दिलीप कदम, विजय पाडळकर, राजाराम पाटील, प्रवीण सोनार, सर्जेराव शिंदे, महादेव पाटील, ऐश्वर्या सोनार, सुवर्णा पाटील, कांचन पाटील, सुवर्णा पाडळकर, दीप्ती कदम, अवंतिका देशपांडे, सविता पाडळकर, शुभांगी रेमाणिचे, ‘सकाळ’चे वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) ओंकार कोठावळे, विश्वनाथ चव्हाण, राहुल दळवी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.