मोहरम- त्र्यंबोली यात्रा

मोहरम- त्र्यंबोली यात्रा

‘डौल्या पी पी’, ‘पी ढबाक’चे सूर एकाचवेळी
मोहरमचा कुदळ विधी उद्या : मंगळवारपासून त्र्यंबोली यात्रा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असलेल्या मोहरमला रविवारी (ता. ७) पासून प्रारंभ होणार आहे. मंगळवार (ता. ९) पासून आषाढातील त्र्यंबोली यात्रांना प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने आषाढाच्या सुरुवातीलाच यंदा ‘डौल्या पी पी’ आणि ‘पीऽऽऽ ढबाक'' या पारंपरिक वाद्यांचे सूर शहरात उमटणार आहेत.
त्याग व समर्पणाचा मोहरम हा सण केवळ मुस्लिम नव्हे, तर हिंदूधर्मीयही साजरा करतात. सामाजिकतेची झालर असणारा हा सण असल्याने, शहरातील बहुतांश तालमींत पंजांची प्रतिष्ठापना होते. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी (ता. ७) सर्वत्र कुदळ मारण्याचा विधी होईल आणि त्यानंतर सोमवार (ता. ८) पासून पंजे प्रतिष्ठापनेला प्रारंभ होईल. १६ जुलैला खत्तलरात्र असून १७ जुलैला पंजांचे विसर्जन होईल.
...
आनंदोत्सव अन् कारुण्याची झालर
बदलत्या काळात त्र्यंबोली यात्रांच्या मिरवणुकांचे स्वरूप बदलले. मात्र कोल्हापूरकरांनी यात्रेच्या निमित्ताने ‘पीऽऽऽ ढबाक’चे महत्त्व अबाधित ठेवले आहे.
‘पीऽऽऽ ढबाक’ या नावातही अस्सल रांगडा कोल्हापूरचाच बाज आहे. ‘पी म्हणजे पिपाणी आणि ढबाक म्हणजे डफड्याचा आवाज’. होलार समाजाचं हे प्रमुख वाद्य आहे. ‘पीऽऽऽढबाक’च्या तालावर आनंदोत्सव साजरा होतो. त्याचीच थोडी धून बदलून ‘डौल्या पी पी’ हे वाद्य वाजवले जाते. मात्र, त्याला कारुण्याची झालर असते.

असाही योगायोग
अनुभवायला मिळणार
एकीकडे मोहरम आणि त्र्यंबोली यात्रांचा माहोल असताना पंढरपूरकडे वारकऱ्यांच्या दिंड्यांचे प्रस्थान होऊ लागले आहे. यंदा आषाढी एकादशी आणि मोहरम एकाच दिवशी आला आहे. त्यामुळे सकाळपासून सर्वत्र टाळ-मृदंगाचा गजर असेल तर दुपारनंतर पंजे विसर्जनाच्या निमित्ताने ‘डौल्या पी पी’चे सूर उमटणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com