मॅरेथॉनपटू अमोल यादव यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मॅरेथॉनपटू अमोल यादव यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Published on

95084
कोल्हापूर ः दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवलेल्या अमोल यादव यांचा पालकमंत्री हसन मूश्रीफ यांच्या हस्ते शुक्रवारी सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
.............
मॅरेथॉनपटू अमोल यादव यांचा
पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवलेल्या उंड्री (ता. पन्हाळा) तील अमोल यादव यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातून भारताचे प्रतिनिधित्व करणारे यादव पहिलेच कॉम्रेड रनर ठरले.
दक्षिण आफ्रिकेतील डर्बन व पीटरमेरीसबर्ग या दोन शहरांतून ही मॅरेथान झाली. तेथील सैनिकांच्या स्‍मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली जाते. अत्यंत खडतर असलेल्या या स्पर्धेत यादव यांनी ८७ किलोमीटरचे अंतर १२ तासांच्या आत पार करायचे होते. त्यांनी ते ८ तास २२ मिनिटांत पूर्ण करून चौथा क्रमांक पटकावला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार आदी उपस्थित होते.
...............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.