आनंददायी उपक्रमास प्रारंभ

आनंददायी उपक्रमास प्रारंभ

Published on

‘आनंददायी शनिवार’ला
‘कोरगांवकर’मध्ये प्रारंभ
कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण मंडळ संचालित सदर बाजार येथील कोरगांवकर हायस्कूलमध्ये आनंददायी शनिवार उपक्रमास सुरूवात झाली. शासनाच्या आनंददायी शनिवार उपक्रमानुसार शाळेमध्ये पुस्तक आणि अन्य शालेय साहित्याच्या ओझ्याविना विद्यार्थी आले होते. दर शनिवारी कला, क्रीडा, मनोरंजन, बौद्धिक व्याख्यान, सामान्य ज्ञान, कसरत, योगा, मासपीई, समुहगान, देशभक्तीपर गीते, कथाकथन आदी विविध प्रकारांचे नियोजन होणार असल्याचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी सांगितले. मनोरंजन अंतर्गत जादूगार फारूख अब्बास यांनी कलात्मक, कौशल्यात्मक आणि हातचलाखीचे प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. पर्यवेक्षिका प्रमिला साजणे, प्रभुप्रसाद रेळेकर, सुरेखा पोवार, सदाशिव हाटवळ यांनी संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.