गोरोबा काका मुर्ती संघटना

गोरोबा काका मुर्ती संघटना

Published on

शाडू गणेशमूर्ती संघटनेची स्थापना
कोल्हापूर, ता. ६ ः प्रत्येक महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना गणेशमूर्ती करण्यासाठी जागा व शाडूमाती मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर संत गोरोबा कुंभार शाडू गणेशमूर्ती संघटनेची स्थापना झाली आहे. याबाबत शाहूपुरी कुंभार गल्ली येथे नुकतीच संघटनेची बैठक झाली.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला जास्तीत जास्त चालना देण्यासाठी प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात केवळ पर्यावरणपूरक गणेशमूर्तिकारांना शाडू मातीची गणेश मूर्ती करण्यासाठी जागा व शाडूमाती मोफत उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. त्या सूचनेबाबत संघटना महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करण्याचे बैठकीत ठरले. यावेळी ज्येष्ठ कलावंत, शिल्पकार, उपस्थितीत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.