‘क्रीडा प्रबोधिनी’ च्या फुटबॉल केंद्राला हवे राजकीय बळ

‘क्रीडा प्रबोधिनी’ च्या फुटबॉल केंद्राला हवे राजकीय बळ

‘क्रीडा प्रबोधिनी’च्या फुटबॉल केंद्र परतीसाठी हवे राजकीय बळ
सिटिझन एडिटर उपक्रमातील सूर ः ग्रासरूटपासून तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी आवश्‍यक
...

95328
95423
95425
95426
95427
...
लीड...
कोलकाता आणि गोव्यानंतर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक फुटबॉल खेळ खेळला जातो. जवळपास सोळा वरिष्ठ संघांसह ब, क, ड आणि ग्रामीण फुटबॉलमधील संघ अशा सव्वाशेहून अधिक संघांकडून साडेचार हजार खेळाडू खेळतात. पेठापेठांसह उपनगरांतही असे संघ तयार झाले आहेत. या खेळाला तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची जोड मिळावी, यासाठी फुटबॉल खेळणाऱ्या बारा, चौदा आणि सतरा वर्षांखालील मुले-मुलींना फुटबॉलमधील आधुनिक तंत्रे अवगत होणे गरजेचे आहे. त्यासाठी पूर्वी कोल्हापुरातून पुण्यात हलविलेल्या क्रीडा प्रबोधिनीच्या निवासी फुटबॉल केंद्राची आवश्‍यकता आहे. यामध्ये घडलेले खेळाडू थेट राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. मूलभूत फुटबॉलचे प्रशिक्षण या वयातील मुला-मुलींना मिळाले तर पुढे चांगले फुटबॉलपटू राज्यासह देशाला मिळतील. या फुटबॉल पंढरीचा आणखी नावलौकिक वाढेल. हे केंद्र पुन्हा सुरू होण्यासाठी फुटबॉल संघ, क्लब, तालीम संस्था, फुटबॉल प्रेमींचा रेटा आवश्‍यक आहे. याशिवाय सर्वात महत्त्‍वाचे म्हणजे राजकीय बळ आवश्‍यक आहे.
...
.... तर एका रात्रीत हे केंद्र कोल्हापुरात शिफ्ट होईल
अकबर मकानदार, माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू व माजी सहायक आयुक्त, केंद्रीय जीएसटी विभाग

भारतीय फुटबॉलमध्ये नॉर्थ ईस्ट म्हणजे मणिपूर, आसाम आदी क्षेत्रातून फुटबॉस टॅलेंट येत आहे. कारण या भागात अगदी लहानग्या वयात या मुलांना शाळा शिकायची असेल तर दहा-दहा किलोमीटरचे डोंगर पायी चालून पार करून जावे लागते. त्यामुळे लहानपणापासून ती मुले शारीरिकदृष्ट्या तगडी बनतात. या खेळात ती मुले सर्वच ऋतूत कोणत्याही परिस्थितीत खेळू शकतात. मात्र, महाराष्ट्रात ही परिस्थिती नाही. कोल्हापुरात मंगळवार पेठ, शिवाजी पेठेसह अनेक पेठा फुटबॉलची खाण आहेत. या मुला-मुलींना एक तर राष्ट्रीय खेल प्राधिकरण किंवा क्रीडा विभागाच्या क्रीडा प्रबोधिनीतील निवासी फुटबॉल केंद्राची आवश्‍यकता आहे. कारण या मुलांना राज्य, राष्ट्रीय पातळीवर पोहचायचे असेल तर अशा निवासी केंद्रातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची जोड मिळणे आवश्‍यक आहे.
...
...
पॉईंटर
- हरियाणा, बिहार आदी राज्यांतील मुलांप्रमाणे कणखर, स्पर्धात्मक परीक्षेला तयार असलेली मुले या केंद्रातून घडतील.
- तंत्रशुद्ध प्रशिक्षण, पुरेसा आहार व खेळासंबधी अन्य सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ही मुलेही अल्पावधीतच आयलीग, भारतीय फुटबॉल संघातून खेळतील.
- साई किंवा क्रीडा प्रबोधिनीच्या निवासी फुटबॉल केंद्राची आवश्‍यकता येथे आहे.
- खेळाविषयी तत्पर असलेल्या राज्य सरकारने मनावर घेतले तर हे केंद्र एका रात्रीत कोल्हापुरात शिफ्ट होईल.
-कोल्हापुरातील अनेक पेठा फुटबॉलची खाण
...

या केंद्रामुळे माझ्यासारखे आणखी खेळाडू घडतील
- अनिकेत जाधव, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू व माजी खेळाडू क्रीडा प्रबोधिनी, पुणे

क्रीडा प्रबोधिनीच्या पुणे केंद्रात मी फुटबॉलचे तंत्रशुद्ध धडे घेतले. तेथेच आहाराविषयी, खेळातील तंत्रे, खेळाविषयी सखोल ज्ञान, प्रात्यक्षिके, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळते. फुटबॉल खेळाचे वेड कोल्हापूरकरांना आहे. घराघरांत, पेठापेठांमध्ये हा खेळ पोहचला आहे. केवळ स्थानिक फुटबॉल स्पर्धां, शालेय राज्य, राष्ट्रीय स्पर्धांपुरता हा खेळ मर्यादित राहिलेला नाही. येथून अनेक मुले मुंबई, गोवा, पुणे, बंगळूरू आदी ठिकाणी अधिकचे ज्ञान घेण्यासाठी जातात. त्यांना अगदी ग्रासरूटपासून प्रशिक्षण केवळ क्रीडा प्रबोधिनीच्या निवासी फुटबॉल केंद्रातून मिळणे शक्य आहे. त्याकरिता कोल्हापुरातून पूर्वी पुण्याला शिफ्ट केलेले केंद्र पूर्ववत कोल्हापुरात सुरू केले तर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू येथून घडतील.
...
...
पॉईंटर
- या केंद्रात मुलांना योग्य आहार, शालेय शिक्षणाची सोय आहे.
- अनेक तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन एकाच छताखाली मिळेल.
- नामांकित संघ खेळाडूंच्या शोधासाठी कोल्हापुरात येतील.
- अगदी ग्रासरूटपासून केंद्रात प्रशिक्षण
-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी
...
निवासी फुटबॉल केंद्रामुळे ‘ग्रासरूट’वर काम करणे शक्य
- पृथ्वी गायकवाड, एएफसी ‘सी’ लायसन प्रशिक्षक

राष्ट्रीय खेल प्राधिकरण (साई) केंद्रातील अनेक मुले-मुली थेट आयलीग, यूथ लीग, आयएसएलमध्ये अनेक नामांकित संघाकडून खेळतात. कारण त्या मुलांना ग्रासरूट पासूनचे शिक्षण या केंद्रातून दिले जाते. या भागातील मुला-मुलींना या केंद्रात आधुनिक फुटबॉलचे धडे मिळतील आणि त्यासोबत डी लायसन, सी, बी लायनस प्रशिक्षकांना येथे नोकऱ्याही उपलब्ध होतील. खेळाडूंना परिपूर्ण आहार मिळेल. याशिवाय आर्थिक स्थैर्यही या केंद्रातून मिळेल. बारा, चौदा आणि सतरा वर्षांखालील मुलां-मुलींकरीता हे केंद्र वरदान ठरणार आहे.
...
...
पॉईंटर
- येथील प्रशिक्षित मुला-मुलींना थेट आयलीग, यूथलीगसारख्या स्पर्धांत नामांकित संघांकडून संधी मिळू शकते.
- राष्ट्रीय, राज्य संघात येथील खेळाडूंना पहिले प्राधान्य दिले जाते.
- पायाभूत सुविधा या केंद्रातून प्रवेशित मुलांना मिळणार आहेत. त्यामुळे खेळाचा विकास होईल.
- स्थानिक प्रशिक्षकांना येथे काम करण्याची संधी मिळेल.
- यात मुलींसाठीही ग्रासरूटपासूनची प्रशिक्षणाची सोय होईल.
----------------

राजकीय इच्छाशक्ती आवश्यक
- नुरमहंम्मद देसाई, ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक

क्रीडा प्रबोधनीचे निवासी फुटबॉल केंद्र पूर्वी कोल्हापुरात होते. त्यावेळी खेळाडूंची संख्याही चांगली होती. त्यावेळी दिलबहार तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ या दोन्ही संघांचे खेळाडू या केंद्रामध्ये होते. खेळाडूंना पौष्टिक आहार, चांगले प्रशिक्षण मिळत होते. फुटबॉल केंद्रामुळे शिवाजी स्टेडियमची देखभाल वेळच्यावेळी होत होती. मात्र नंतर खेळाडूंची संख्या कमी होत आहे, असे कारण देत हे केंद्र पुण्यात हालवण्यात आले. पुण्याच्या तुलनेत कोल्हापुरात फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोल्हापुरात फुटबॉलचे केंद्र असल्यास शालेय स्तरावरील खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळेल. तसेच त्यातून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यास मदत होईल. मात्र हे करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आवश्यकता आहे. आमदार आणि खासदार यांनी दबावगट बनवून क्रीडा प्रबोधनीचे फुटबॉल केंद्र कोल्हापुरात आणले पाहिजे.
...
...
पॉईंटर
- फुटबॉल संघटनांनी लोकप्रतिनिधींवर दबाव आणला पाहिजे.
- शालेय फुटबॉल स्पर्धांची संख्या वाढल्याने खेळाडू वाढतील.
- फुटबॉल केंद्रामुळे उदयोन्मुख खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळेल.
- क्रीडा संकुल, शिवाजी स्टेडियम येथे फुटबॉल केंद्र सुरू करता येईल.
- फुटबॉल केंद्रामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या संधी उपलब्ध होतील.

----
फुटबॉल केंद्रामुळे राष्ट्रीय पातळीवरील संधी मिळेल
किरण साळोखे, ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक

क्रीडा प्रबोधनीचे निवासी फुटबॉल केंद्र कोल्हापुरात झाल्यास आपल्या खेळाडूंना कमी वयात मोठ्या संधी उपलब्ध होतील. सध्या शाळांमध्ये फुटबॉल किंवा अन्य खेळांचे प्रशिक्षक नाहीत. शाळांकडे चांगली मैदाने नाहीत. त्यामुळे मुलांना प्रशिक्षण मिळत नाही. पर्यायाने शालेयस्तरावरील खेळाडूंची संख्याच कमी असल्याने वरिष्ठ गटातही ही संख्या कमी असते. फुटबॉल केंद्र सुरू झाल्यास शालेय स्तरावरील खेळांडू उत्तम मार्गदर्शन मिळेल. त्यातून खेळाडू घडतील प्रबोधनीच्या माध्यमातून खेळणाऱ्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत थेट प्रवेश मिळतो. त्याचाही लाभ खेळाडूंना मिळेल. यासाठी फुटबॉल केंद्र कोल्हापुरात यावे, यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अनेक गुणवंत खेळाडू आहेत. फुटबॉल केंद्र झाल्यास त्यांना सुविधा आणि मार्गदर्शन मिळेल. त्यातून त्यांच्या कौशल्यालाही संधी प्राप्त होईल.
...
....
पॉईंटर
- स्थानिक खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक आणि पंच यांनाही संधी उपलब्ध होईल.
- मैदानांची देखभाल दुरुस्ती वेळच्यावेळी होईल.
- सर्वच शाळांच्या विद्यार्थ्यांना आपला खेळ दाखवण्याची संधी फुटबॉल केंद्राच्या माध्यमातून मिळेल.
- खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या अनेक संधी निर्माण होतील.
- क्रीडा क्षेत्राच्या विस्तारासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com