भडगावची आज गुड्डादेवी यात्रा

भडगावची आज गुड्डादेवी यात्रा

भडगावची आज
गुड्डादेवी यात्रा
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील गुड्डादेवीची यात्रा मंगळवारी (ता. ९) आहे. यात्रेत भडगावसह चोथेवाडी, बंदी वसाहत, बेरडवाडी, चव्हाणवाडी, भोई तळ, मरगुद्रीवाडी, मुकनावरवाडी, समर्थनगर, दत्तनगर, आदी वाडीतील भाविक सहभागी होतात. पहाटेपासून गरम पाण्याचे कलश घेऊन मंदिरात येतात. देवीला अभिषेक घालून पूजा केली जाते. हा विधी झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाईल. सायंकाळी पाचला गुड्डादेवी मंदिरापासून पालखी मिरवणूक सुरू होईल. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
-----------------------------
gad71.jpg :
95270
रफिक पटेल, कौसर मुल्लाणी

लायन्सच्‍या अध्यक्षपदी
रफिक पटेल
गडहिंग्लज : येथील लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज रॉयलची कार्यकारिणी निवडली. अध्यक्षपदी रफिक पटेल यांची, तर उपाध्यक्षपदी कौसर मुल्लाणी यांची निवड झाली आहे. सचिवपदाची जबाबदारी अलोक तेलवेकर, तर खजिनदारपद कौस्तुभ बुरूड यांच्याकडे सोपवले. २०२४-२५ या वर्षासाठी या निवडी केल्या. वर्षभरात सामाजिक, शैक्षणिक व गरजू गरिबांसाठी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. यावेळी डॉ. किरण खोराटे, डॉ. पी. पी. पाटील, अमित कुलकर्णी, सुरेश कोळकी, आदी उपस्थित होते.
------------------------
विविध उपक्रमांनी
मुखर्जी जयंती
गडहिंग्लज : येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी ग्रंथालय व अभ्यासिकेतर्फे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले. संस्थेचे अध्यक्ष संदीप नाथबुवा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष तेली यांच्या हस्ते दीपस्तंभाचे पूजन झाले. श्यामा प्रसाद मुखर्जी गृहतारण संस्थेच्या सचिव स्मिता पाटील यांचे भाषण झाले. उपजिल्हा रुग्णालयातील २२ बाळंतिणींना पोषण प्रथिनांचे वाटप केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत उपस्थित होते. भडगाव येथील गुड्डादेवी डोंगरावर वृक्षारोपण केले. सरपंच वंदना शेंडुरे, संतोष पेडणेकर, अशोक पट्टणशेट्टी, दीपा कुलकर्णी, महेश रिंगणे, आदी उपस्थित होते.
----------------------------
जागृतीत मानसशास्त्रीय
चाचणी कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रीय चाचणी कार्यशाळा झाली. प्रा. विश्वनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. एस. एन. शिंदे अध्यक्षस्थानी होते. मानसशास्त्रीय मापन संकल्पना, चाचणीचे महत्त्‍व, चाचणी कशा स्वरूपाची घ्यावी, चाचणीचे विश्‍लेषण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. शिंदे यांचेही भाषण झाले. प्रा. आर. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रभारी प्राचार्य एस. बी. मगदूम, प्रा. एस. एस. जाधव, प्रा. एम. एस. जाधव, प्रा. एम. एम. वंजारे, आदी उपस्थित होते. प्रा. ए. एम. नवले यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com