प्रायव्हेट हायस्कूलमध्ये कालिदास दिन

प्रायव्हेट हायस्कूलमध्ये कालिदास दिन

Published on

95274
कोल्हापूर ः प्रायव्हेट हायस्कूलमध्ये कालिदास दिनानिमित्त संस्कृतभारतीतर्फे आयोजित संस्कृत सरला व सुगमा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.


प्रायव्हेट हायस्कूलमध्ये कालिदास दिन
कोल्हापूर ः आषाढीच्या पहिल्या दिवशी साजरा होणारा कालिदास दिन प्रायव्हेट हायस्कूलमध्ये विविध उपक्रमांनी झाला. महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यापक जगदीश जोशी यांनी कालिदास यांच्याविषयी माहिती सांगितली. संस्कृतभारतीतर्फे आयोजित संस्कृत सरला व सुगमा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या परीक्षेत शाळेच्या २५० विद्यार्थ्यांनी यश मिळवले. संस्कृत गीतामाता परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला. यावेळी मुख्याध्यापक गिरीश जांभळीकर, पर्यवेक्षक प्रसन्न जोशी, जिमखाना प्रमुख संतोष गानबावले उपस्थित होते. मानसी निगुडकर यांनी प्रास्ताविक केले. ऋतुजा नाईक यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.