विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Published on

95452
कोल्हापूर : अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपप्रसंगी उपस्थित मान्यवर.
...
अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत दिव्यांग
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
कोल्हापूर, ता.७ : अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत गुणवंत आणि गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पायमल यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
मालोजीराजे छत्रपती यांनी दिव्यांगत्त्वावर मात करीत परीक्षेत चांगले गुण मिळवल्याबद्दल सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. तुकाराम माळी तालमीचे अध्यक्ष संदीप चौगुले यांनी सर्व दिव्यांगांचे अभिनंदन केले. तसेच भारत सरकारकडून दिव्यांगांसाठी असणाऱ्या शासकीय सर्व योजना सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
मालोजीराजे यांच्या हस्ते चाळीस दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. सचिव बापूराव चौगुले यांनी आभार मानले. यावेळी अजय वणकुद्रे, वसंत कांबळे, विलास मोरस्कर, दत्तात्रय म्हामुलकर, उमा पवार, प्रल्हाद मोरे, दिलीप वाईगडे, पांडुरंग देवणे, शोभा सावंत आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.