पुढील पिढीसाठी झाडे लावणे व जगवणे महत्त्वाचे : डॉ. व्ही. एन. शिंदे

पुढील पिढीसाठी झाडे लावणे व जगवणे महत्त्वाचे : डॉ. व्ही. एन. शिंदे

Published on

‘पुढील पिढीसाठी
झाडे लावणे महत्त्वाचे’
कोल्हापूर : श्री शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या न्यू कॉलेजचा ग्रीन क्लब, एन. सी. सी, भूगोल व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हणबरवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण झाले. यावेळी डॉ. शिंदे यांनी झाडांचे महत्त्व व त्यांची उपयुक्तता सांगत पुढील पिढीसाठी झाड लावणे व जगवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. संचालक प्रा. विनय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना संस्थेच्या हणबरवाडी येथील शेतामध्ये २० एकर परिसरात चार हजार देशी झाडे असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, डॉ. मनीषा नायकवडी, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, प्रबंधक एम. वाय. कांबळे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.