दोन लाखासाठी बापावर उगारली तलवार

दोन लाखासाठी बापावर उगारली तलवार

Published on

दोन लाख रुपयांसाठी
बापावर उगारली तलवार

व्यसनी मुलाचे कृत्य; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : ‘माझ्या बँक खात्यावर दोन लाख जमा करा, नाहीतर तुम्हाला संपवतो’ असे म्हणत स्वतःच्या आई-वडिलांवर तलवार उगारणाऱ्या साई नलवडे (वय २४, रा. उत्तरेश्वर पेठ) याला अटक केली. मुलाचा रौद्रावतार पाहून घराचे दार बंद करून घेतल्याने आई-वडील बचावले. शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या प्रकाराची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसांत झाली.
संशयित साई नलवडे याचे शालेय शिक्षण सातारा येथे झाले, तर महाविद्यालयात प्रवेशानंतर काही मुलांमुळे तो व्यसनाच्या आहारी गेला. यातून तो वारंवार वडिलांकडे पैशांची मागणी करीत होता. शुक्रवारी मध्यरात्री त्याने दोन लाख रुपयांची मागणी करीत वडिलांकडे हट्ट धरला होता. त्यांना नकार दिल्याने तलवार घेऊनच तो वडिलांच्या अंगावर धावून गेला. दोन दिवसांत ही रक्कम द्या नाही तर तुम्हाला संपवतो, असे म्हणत त्याने घराच्या दारावर तलवारीने हल्ला केला. वडिलांनीच अखेर पोलिस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या कानावर घातला. पोलिसांनी संबंधित मुलाला तलवारीसह ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.