रेडिओलॉजी असोसिएशन कार्यशाळा

रेडिओलॉजी असोसिएशन कार्यशाळा

Published on

95539
...

डेक्कन महाराष्ट्र रेडिओलॉजी
असोसिएशनची कार्यशाळा
कोल्हापूर, ता. ८ : डेक्कन महाराष्ट्र रेडिओलॉजी अॅन्‍ड इमेजिंग असोसिएशन व डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यामाने सोनोग्राफीतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर्स यांची ‘फिटोफेस्ट’ ही दोन दिवसीय कार्यशाळा झाली.
कोईमतूर व हैद्राबाद येथील सोनोग्राफीतज्ज्ञ डॉ. बालू वैद्यनाथन व डॉ. बिजॉय बालकृष्णन, औरंगाबादच्या डॉ. शिल्पा सातारकर, डॉ. अपूर्वा यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
गर्भवती महिलांच्या पोटातील अर्भकाच्या सोनोग्राफीबद्दल तज्ज्ञांनी माहिती दिली. यामध्ये कोल्हापूरसह सातारा, सांगली, कोकण, बेळगाव, पुणे, लातूर, सोलापूर येथील डॉक्टर्स उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्‍घाटन लातूर येथील रेडिओलॉजिस्ट व इंडियन रेडिओलॉजिस्ट संघटनेचे सचिव डॉ. संदीप कवठाळे, डॉ. पंकज शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. बाळकृष्ण कित्तुरे, डॉ. रानडे, डॉ. धनंजय धोंगडे, डॉ. वाधवानी, डॉ. अमित माळवी, डॉ. नागुरे, डॉ. स्वेनिल शहा, डॉ. आशिष पाटील, डॉ. वेदवती खरे, डॉ. महेश शेप्टेनवार, डॉ. सायली कर्णिक, आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत क्ष-किरणतज्ज्ञ डॉ. विश्राम मेहता यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.