निसर्गसौंदर्यामुळे पर्यटनाला चालना

निसर्गसौंदर्यामुळे पर्यटनाला चालना

chd82.jpg
95631
हजगोळी ः वन हद्दीमध्ये आमदार राजेश पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण केले. या वेळी वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे आदी.
-------------------
निसर्गसौंदर्यामुळे पर्यटनाला चालना
आमदार राजेश पाटील ः पाटणे वन विभागामार्फत वृक्षारोपण
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ८ ः चंदगड तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. ते टिकवणे आणि वाढवणे ही स्थानिक नागरिकांची जबाबदारी आहे. हाच निसर्ग पर्यटन विकासाला चालना देणारा असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
पाटणे (ता. चंदगड) वन विभागातर्फे हजगोळी (ता. चंदगड) हद्दीतील बंगलेमाळ वन क्षेत्रात त्यांच्याहस्ते वृक्षारोपण केले. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘घाटमाथ्यावर कोसळणारा प्रचंड पाऊस, धबधबे, स्वच्छ हवा, विविध प्रकारचे वृक्ष, प्राणी, पक्षी ही आपली संपत्ती आहे. त्याचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीत आणि शेतात घुसत आहेत. पर्यावरणही धोक्यात आले आहे. दरवर्षी वृक्षारोपण केले जाते; परंतु त्यांची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे झाडे जगवण्याबाबत जागरुक रहा.’ वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांच्याहस्ते आमदार पाटील यांचा सत्कार केला. ते म्हणाले, ‘चंदगड तालुका हा गोवा, कोकण आणि कर्नाटकच्या सीमेवर वसला आहे. या तालुक्यावर निसर्गाची कृपा आहे. तिची जपणूक करण्यासाठी वन विभाग कटिबद्ध आहे.’ सरपंच शीतल पवार, सुरेश पाटील, नेमाणा पाटील, हर्षवर्धन कोळसेकर, मारुती नाकाडी उपस्थित होते.
-----------
अवैध वृक्ष तोड थांबवा
आमदार पाटील यांनी वन विभागाच्या कारभारावरही बोट ठेवले. अवैध वृक्षतोडीमुळे चंदगडच्या जंगलांची श्रीमंती हरवत चालली आहे. वन विभागाने ती थांबवायला हवी. नवीन रोपांची लागवड आणि संवर्धन करायला हवे. आगीपासून जंगलांचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्वाधिक काळजी वन विभागानेच घ्यायला हवी याबाबत सूचना केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com