इनरव्हील क्लब

इनरव्हील क्लब

Published on

95636
...
डॉक्टर्स, सीए दिनानिमित्त
इनरव्हील क्लबतर्फे विविध उपक्रम

कोल्हापूर, ता. ८ : इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजतर्फे डॉक्टर्स आणि सी. ए. दिनानिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवनात रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गायन व नृत्य स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत डॉक्टर्स आणि सी.ए.नी सहभाग घेतला.
अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने, नम्रता गायकवाड, दिग्दर्शक पांडुरंग जाधव, निर्माते डॉ. आशिष अग्रवाल, लेखक विपुल पाटील, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर आणि क्लब प्रेसिडेंट स्मिता सावंत, सचिव नंदिनी पाटील, कोषाध्यक्ष वृषाली बाड, आयएसओ दिव्या घाडगे, पूनम सरनाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले.
प्रास्ताविक अध्यक्ष स्मिता सावंत यांनी केले. या कार्यक्रमातून संकलित झालेला निधी गरजूंच्या मदतीसाठी केला जाणार आहे. यावेळी इनरव्हील क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. विद्युत शहा, सरदार पाटील, शिवसेनेचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार उपस्थित होते. नंदिनी पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.