आजरा ः टोल हटवण्यासाठी धरणे आंदलन बैठक

आजरा ः टोल हटवण्यासाठी धरणे आंदलन बैठक

टोल हटवण्यासाठी आजरा
तहसीलसमोर धरणे धरणार

बैठकीत निर्णय; प्रांताधिकाऱ्यांना देणार निवेदन

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ८ ः संकेश्वर-बांदा महामार्गावरील आजरा औद्योगिक वसाहतीजवळ उभारण्यात येत असलेला टोल हटावसाठी २२ जुलैला आजरा तहसीलवर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय टोलमुक्ती संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत आज भुदरगड प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्याचेही ठरले. येथील ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराच्या सभागृहात टोलमुक्ती संघर्ष समितीची बैठक झाली. कॉ. संपत देसाई म्हणाले, ‘खरं तर हा राज्य मार्गच असल्याने टोलचा संबंध येत नाही. जनतेतून उठाव होण्याची गरज आहे. ग्रामसभांचे ठराव करावेत. वेळ पडल्यास प्रशासनाला जाग आणण्यासाठी धरणे आंदोलनाची गरज आहे. ग्रामीण भागातील जनतेला सहभागी करून घेण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.’ 
डॉ. उल्हास त्रिरत्ने म्हणाले, ‘टप्प्याटप्प्याने आंदोलन तेवत ठेवण्याची गरज आहे.’ बंडोपंत चव्हाण म्हणाले, ‘१५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ठराव घ्यावा.’ जुबेर चाँद म्हणाले, ‘एकजूट होऊन आक्रमता दाखवावी.’ राधानगरी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश आबिटकर, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे विजय थोरवत यांनी सांगितले. प्रभाकर कोरवी, परशराम बामणे, रशिद पठाण, दशरथ अमृते, प्रकाश मोरसकर, रणजित सरदेसाई, काशिनाथ मोरे, आरिफ खेडेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. मुकुंदराव देसाई, शांताराम पाटील, पांडुरंग सावरतकर, रवींद्र भाटले, इंद्रजित देसाई, पद्मिनी पिळणकर, गौरव देशपांडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com