सायबर महिला महाविद्यालय

सायबर महिला महाविद्यालय

Published on

सायबर महिला महाविद्यालयात
पालक सभा उत्साहात

कोल्हापूर, ता. ८ : सायबर महिला महाविद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थिनींसाठी उद्‍बोधन कार्यक्रमाची सुरुवात पालक सभेने करण्यात आली. प्रभारी प्राचार्या प्रज्ञा कापडी, डॉ. ए. आर. कुलकर्णी व पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्‍यात आले.
डॉ. ए. आर. कुलकर्णी यांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२० व अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स याची ओळख करून दिली. प्रभारी प्राचार्या प्रज्ञा कापडी यांनी घेण्यात येणाऱ्या उद्‍बोधन कार्यक्रमाची माहिती दिली. यानंतर कापडी यांनी फॅशन डिझाईन, डॉ. नीलम जिरगे यांनी फूड टेक्नॉलॉजी, आर्किटेक्ट सीमा पाटील यांनी इंटेरियर डिझाईन, प्रा. प्रियांका चव्हाण यांनी पर्यावरणशास्त्र व प्रा. सविंदर कौर - गांधी यांनी कॉमर्स कोर्सेसची ओळख करून दिली. शारीरिक शिक्षण संचालक रामेश्वरी गुंजीकर यांनी जिमखाना विभागातील उपलब्ध सोयींची माहिती करून दिली. प्रशासकीय अधिकारी बी. एस. मंदिलकर यांनी कार्यालय कार्यपद्धती आणि उपलब्ध शिष्यवृत्ती यांची माहिती दिली. ग्रंथपाल अनुराधा कुंभार यांनी ग्रंथालय सुविधांची ओळख करून दिली. वसतिगृहातील सुविधांची माहिती प्रा. ज्योती हिरेमठ यांनी दिली. सूत्रसंचालन डॉ. सुनीता दलवाई यांनी केले. प्रा. रितिका चंदवानी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सायबर ट्रस्टचे प्रेसिडेंट व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. आर. ए. शिंदे व सचिव एच. आर. शिंदे यांचे सहकार्य मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.