ईपीएस योजना

ईपीएस योजना

Published on

महापालिका ... लोगो
...
महापालिकेतील २००७ कर्मचाऱ्यांना
राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना लागू
कोल्हापूर, ता. ८ : महापालिकेकडील १९०० व पाणीपुरवठा विभागातील १०७ कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्त वेतनचा (एनपीएस) लाभ देण्याचा निर्णय प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी घेतला. यामध्ये कर्मचाऱ्यांचा हिस्सा १० टक्के व महापालिकेचा हिस्सा १४ टक्के राहणार आहे.
याबरोबरच प्राथमिक शिक्षण मंडळाकडील ९७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती योजनेचा खातेक्रमांक देण्यात आला आहे. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आस्थापना विभागाकडे माहिती सादर करायची आहे. या योजनेंतर्गत संबंधित कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमधून निवृत्तीनंतर व कर्मचारी दिवंगत झाल्यास त्यांच्या पात्र वारसांना पेन्शन व इतर लाभ मिळू शकतात. जे अधिकारी, कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर महानगरपालिकेत नियुक्त झाले आहेत, त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. कार्यालयीन कामासाठी विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रश्नी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनील काटे, सहायक आयुक्त संजय सरनाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.