गड- गडहिंग्लजला चोरी

गड- गडहिंग्लजला चोरी

Published on

गडहिंग्लजला बंद घर फोडून
दीड लाखांचा ऐवज पळविला

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : येथील रहिवासी संजीव देशपांडे यांच्या बंद घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील कापून आत प्रवेश करून दीड लाखाच्या किमतीचा सोन्याचा ऐवज चोरट्यांनी पळविला. आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ही घटना उघडकीला आली.
पोलिसांनी सांगितले की, आजरा रोडवरील घाळी कॉलनीमध्ये देशपांडे यांचा ''स्वप्नशिल्प'' नावचा बंगला आहे. त्यांची पत्नी काही दिवसांपूर्वीच प्रवासाला गेल्या आहेत. मुलगा नोकरीनिमित्त बाहेरच असतो. देशपांडे एकटेच घरी होते. दरम्यान, ७ जुलैला दुपारी तेही घराला कुलूप लावून मुलीकडे बेळगावला गेले होते. तेथे मुक्काम करून आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ते घरी आले. बेडरूममध्ये गेले असता तेथील खिडकीचे लोखंडी ग्रील कापल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लाकडी कपाटातील साहित्यही विस्कटले होते. कपाटात असलेली अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण आणि अर्धा तोळ्याचे सोन्याची कुडे, झुबे आढळले नाहीत. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर देशपांडे यांनी पोलिसांत या घटनेची फिर्याद दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.