बसवेश्वरांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटवा

बसवेश्वरांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटवा

Published on

95895
गडहिंग्लज ः बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दिले.
.....
बसवेश्वरांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटवा

वीरशैव समाज सेवा मंडळाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ ः शहरातील संकेश्वर रोडवरील महात्मा श्री बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी वीरशैव समाज सेवा मंडळाच्या बसवेश्वर पुतळा प्रतिष्ठानने केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दिले.
संकेश्वर रोडवर वीरशैव चौकामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांचा पंचधातूचा पुतळा बसविला आहे. या पुतळ्यासमोर भाजी विक्रेते व इतर किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पुतळा दृष्टिपथात पडत नाही. पुतळ्याचा परिसर विद्रूप झाला असून, पुतळा परिसरात अस्वच्छताही वाढली आहे. वारंवार सूचना देऊनही विक्रेते दाद देत नाहीत. या अतिक्रमणांचा बाजारपेठेत ये-जा करणाऱ्या पादचारी व वाहनधारकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे पुतळ्यासमोर बसणाऱ्या भाजी व इतर साहित्य विक्रेत्यांना बसू देऊ नये. बसल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. हे अतिक्रमण कायमस्वरूपी हटवून परिसर स्वच्छ व सुरक्षित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू.
राजशेखर दड्डी, बसवराज आजरी, सुरेश कोळकी, सचिन घुगरे, काशीनाथ घुगरे, राजेंद्र तारळे, महादेव मुसळे, विलास रामनकट्टी, शिवानंद मुसळे, बाळासाहेब घुगरे, डॉ. एम. एस. बेळगुद्री, प्रीतम कापसे, रवी चौगुले, सचिन आजरी, रोहन कुरबेट्टी आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
.......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.