इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीच्या मानद शास्त्रज्ञपदी प्रा. एस. आर. यादव

इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीच्या मानद शास्त्रज्ञपदी प्रा. एस. आर. यादव

Published on

फोटो- 95910

इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीच्या
मानद शास्रज्ञपदी प्रा. एस. आर. यादव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव यांची इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमी (इन्सा) या प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेकडून मानद शास्रज्ञ म्हणून निवड झाली. याबद्दल कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी काल विद्यापीठ कार्यालयात त्यांचे ग्रंथ भेट देऊन अभिनंदन केले.
डॉ. शिर्के म्हणाले, ‘डॉ. यादव यांनी वनस्पतीशास्रामध्ये जागतिक दर्जाचे संशोधन करून विद्यापीठाचा नावलौकिक उंचावला आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी संशोधन कार्यात खंड पडू दिलेला नाही, ही सर्वच क्षेत्रांतील संशोधकांसाठी आदर्शवत बाब आहे.’ डॉ. यादव म्हणाले, ‘आजवर मी जे थोडेफार संशोधन करू शकलो आहे, त्यामध्ये विद्यापीठ या माझ्या मातृसंस्थेचा मोलाचा वाटा आहे. भावी काळातही वनस्पतीशास्रातील संशोधन करत राहण्याचा मानस आहे.’
प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, वनस्पतीशास्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. आर. व्ही. गुरव उपस्थित होते. दरम्यान, प्रा. यादव हे सध्या विद्यापीठाच्या वनस्पतीशास्र अधिविभागात इन्सा वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर आता ‘इन्सा’कडून त्यांची मानद शास्रज्ञ म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. असा सन्मान प्राप्त करणारे विद्यापीठातील ते पहिले शास्रज्ञ आहेत. या अंतर्गत त्यांना संशोधनविषयक बाबींसाठी एक लाख रुपयांचे अनुदानही मिळणार आहे. यापूर्वी त्यांना केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने ‘इ. के. जानकी अम्मल जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.