जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ

जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ

Published on

gad95.jpg
95920
नूल ः सिद्धेश्वर मठातर्फे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या सत्कारप्रसंगी गुरुसिद्धेश्वर महास्वामी, पुष्पराज बस्ताडे, रामगोंडा पाटील, मोहन वाळवे आदी उपस्थित होते.
------------------------------------------------
जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ
गुरुसिद्धेश्वर महास्वामी ः नूलमध्ये शिवानुभव चिंतन
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. ९ ः ‘या जगात आपला जन्मच चांगल्या कामासाठी झालेला आहे. त्यामुळे आपण ज्या मायभूमीत जन्माला आलो, त्या मायभूमीची सेवा ईमाने-ईतबारे करा. अहंकार आणि द्वेषभावना सोडून निष्कामवृतीने जनसेवा, देशसेवा करावी. कारण आपली जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे,’ असे मत येथील सुरगीश्वर मठाचे मठाधीपती श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केले.
नूलपैकी रामपूरवाडी येथील सिद्धेश्वर मठामध्ये आयोजित शिवनुभव चिंतन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्तिक स्वामी यांनी वेदघोष सादर केला. गडहिंग्लज तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रामगोंडा रायगोंडा पाटील, रामपूरवाडी ग्रामस्थांतर्फे गौरव केला. निवृत्त नायक सुभेदार मोहन वाळवे, तायगोंडा देसाई, अरुण हिरेमठ, शिवानंद केस्ती, शरणू स्वामी, शासकीय शिष्यवृत्तीप्राप्त हर्षल पोवार यांचाही सत्कार झाला. हिरेमठ, वाळवे, संजय थोरात यांची भाषणे झाली. विश्वनाथ नाईकवाडी, राजू निकम, बसवराज हिरेमठ, अजित हिरेमठ, संजय मुत्नाळे, काशिनाथ व्हंजी, मारुती खोत, रामा खोत आदी उपस्थित होते. गुरुप्रसाद गुरव यांनी प्रास्ताविक केले. आण्णागोंड पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.