सायबर

सायबर

Published on

सायबरच्या ‘साजमार’ जर्नलचा युजीसीच्या यादीत समावेश
कोल्हापूर, ता. ९ ः छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सायबर) च्या साउथ एशियन जर्नल ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अर्थातच ‘साजमार’ या जर्नलचा समावेश विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे प्रकाशित यादीत करण्यात आला आहे.
यूजीसी केअर यादीमधील जर्नल हे संशोधन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट दर्जाचे जर्नल समजले जातात. हे जर्नल व्यवस्थापन शास्त्रामधील बहुविद्याशाखीय इंग्रजी भाषेमधून प्रकाशित होणारे जर्नल आहे. जर्नलचा यूजीसी केअर लिस्टमध्ये समावेश होण्यासाठी संपादक म्हणून पर्यावरणशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. पूजा पाटील यांनी प्रयत्न केले. यासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एस. पी., सायबर संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. ए . शिंदे, सचिव सीए एच. आर. शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.