विद्यापीठात नॅनो संमिश्रापासून सौर ऊर्जा उपकरणाची निर्मिती

विद्यापीठात नॅनो संमिश्रापासून सौर ऊर्जा उपकरणाची निर्मिती

Published on

फोटो 95974
95975
......

विद्यापीठात नॅनो संमिश्रापासून
सौरऊर्जा उपकरणाची निर्मिती

डॉ. मोरे, डेळेकरांच्या संशोधनास यू. के. सरकारचे पेटंट

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः अतिसूक्ष्म अशा नॅनो-संमिश्रांपासून सौरऊर्जा निर्माण करणाऱ्या अभिनव स्वरुपाच्या बाईंडरविरहित उपकरण तयार करण्याच्या पद्धतीला यू. के. सरकारचे पेटंट मिळाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. क्रांतिवीर मोरे, सागर डेळेकर यांनी ही पद्धती विकसित केली आहे. डॉ. मोरे यांचे संशोधन क्षेत्रातील हे चौथे पेटंट आहे.
वेगवेगळ्या अतिसूक्ष्म नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारे नावीन्यपूर्ण उपकरण कमीत कमी वेळेमध्ये आणि अल्पखर्चामध्ये तयार करण्यात यश आले आहे. कॅडमियम सल्फाइड क्वांटम डॉट, नैसर्गिक रंग, टायटॅनियम डायऑक्साईड या नॅनो मूलद्रव्यांचा वापर त्यासाठी केला. ते उपकरण कमीत कमी तापमानामध्ये अत्यल्प वेळेत बनवता येते. सुलभरीतीने हाताळता येत असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. सौरऊर्जा उत्पादनाचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. म्हणूनच कमीत कमी खर्चातील या नावीन्यपूर्ण उपकरण निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संशोधन केले. त्यातून अतिसूक्ष्म नॅनो संमिश्रांपासून सौरऊर्जा निर्माण करणारी बाईंडरविरहित उपकरणाची पद्धती विकसित केल्याचे डॉ. डेळेकर यांनी सांगितले. संशोधनासाठी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
........
कोट
या नॅनो संमिश्रापासून बाईंडरविरहित सौरऊर्जा उपकरण निर्माण करण्याची नवी पद्धती शोधून डॉ. मोरे, डेळेकर यांनी मोलाची भर घातली आहे. या संशोधनास यू. के. पेटंट जाहीर झाल्याने संशोधनाच्या दर्जावरही जागतिक मोहोर उमटली आहे. संशोधकांची ही कामगिरी अभिमानास्पद व उदयोन्मुख संशोधकांसाठी आदर्शवत आहे.
- डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.