आपत्ती व्यवस्थापन डायरी

आपत्ती व्यवस्थापन डायरी

Published on

96001
...
आपत्ती व्यवस्थापन डायरीचे
महानगरपालिकेत प्रकाशन

कोल्हापूर, ता. ९ : पावसाळ्यात शहर परिसरात उद्‍भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तयार केलेल्या ‘आपत्ती व्यवस्थापन २०२४’ डायरीचे प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते आज प्रकाशन झाले. या डायरीत महापालिकेने करायच्या उपाययोजना व त्यासाठी विभागनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या आहेत.
आयुक्त कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डायरीचे प्रकाशन झाले. अग्निशमन विभागाचे कंट्रोल रूम व आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे क्रमांक आहेत. पावसाळा पूर्व उपाययोजना, विभागनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, पावसाळ्यानंतरच्या उपाययोजना, पाणी येणारी ठिकाणे, निवारा केंद्राची माहिती, चारही विभागीय कार्यालयांकडील निवारा केंद्रांमध्ये नेमलेले अधिकारी व कर्मचारी, पार्किंगची जागा, आपत्ती व्यवस्थापनाच्या साधनांची माहिती आहे. शिवाय सीपीआर, महावितरण, सामाजिक सेवा संस्था, हवामान खाते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस, राष्ट्रीय महामार्ग विभाग, जलसंपदा, पाटबांधारे, मृद व जलसंधारण विभागांची माहितीही आहे. पुराची पातळी वाढण्यापूर्वी करायच्या उपाययोजना व व्यावसायिकांनी घ्यायची काळजी, याची माहितीही डायरीत दिली आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहायक आयुक्त संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.