तीनशे कोटी कर्ज देण्यास विरोध

तीनशे कोटी कर्ज देण्यास विरोध

gad96.jpg
96007
गडहिंग्लज ः कारखान्याला कर्ज देण्यास विरोध असल्याचे निवेदन माजी संचालकांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना दिले.
----------------------------------------------------------
तीनशे कोटी कर्ज देण्यास विरोध
गोडसाखर कारखाना ः विरोधी माजी संचालकांचे प्रांतांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ ः अहमदाबादच्या स्वामी नारायण ट्रस्टतर्फे आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याला (गोडसाखर) ३०० कोटींचे कर्ज घेण्याचे प्रयत्न संचालक मंडळाचे आहेत. परंतु अध्यक्ष-उपाध्यक्षांसह सर्व संचालक व भविष्यात निवडून येणाऱ्या संचालकांवरही या कर्जाची जबाबदारी नसल्याचे कळते. यामुळे वैयक्तीक व सामुदायिक जबाबदारी टाळणाऱ्या संचालक मंडळाला हे कर्ज देण्यास विरोध असल्याचे निवेदन माजी संचालकांसह शिष्टमंडळाने दिले आहे.
साखर आयुक्तांच्या नावचे हे निवेदन येथील प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना दिले. त्यात म्हटले आहे, ‘केडीसीसी बॅंकेकडून कारखान्याने एकूण ९२ कोटींचे कर्ज घेतले आहे. कामगारांचे पगार, पीएफचा भरणा, निवृत्त कामगारांची देणी थकीत आहेत. यामुळे मिळालेल्या कर्जाचा काटकसरीने वापर करून कारखाना कर्जमुक्त करण्याचा संचालक मंडळाने प्रयत्न करण्याची गरज होती. परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. मुळात या कर्जाचा विनियोग चुकीच्या पद्धतीने झाल्याची तक्रार उपाध्यक्षांसह सात संचालकांनी केली आहे. त्यानुसार चौकशी करून कामकाजावर अंकूश ठेवण्याची मागणी आहे. कदाचित या कर्जातून सुटका करून घेण्यासाठी परराज्यातील ट्रस्टकडून ३०० कोटींचे अवाजवी कर्ज उजलण्याचा खटाटोप दिसतो. संचालकांनी सामुदायिक जबाबदारी टाळून कारखान्याची संपूर्ण मालमत्ता तारण ठेवून कर्ज घेण्याचा हा प्रयत्न आहे. संचालक मंडळाने उत्तरदायित्व स्विकारूनच कोणतेही कर्ज घ्यावे.
सभासद हेच कारखान्याचे मालक असल्याने त्यांना विश्वासात घेवूनच कामकाज व्हायला हवे. किमान यंदा तरी संपूर्ण उसाचे गाळप व्हावे, ऊस बिले वेळेत मिळावी, कामगारांचा पगार दरमहा मिळावा, निवृत्त कामगारांची देणी द्यावीत अशीही मागणी आहे. सभासदांना गृहीत धरून भरमसाठ कर्जाचा बोजा निर्माण करून कारखाना खासगी कंपनीला चालवण्यास देण्याचा प्रयत्न असून तसे झाल्यास जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. स्वाती कोरी, अमर चव्हाण, शिवाजी खोत, बाळासाहेब मोरे, बाळकृष्ण परीट, संभाजी नाईक, उदय कदम, श्रीपती कदम, भीमराव पाटील, अमृत शिंत्रे, विकास पाटील, शिवाजी माने, राम मजगी आदींच्या सह्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com