दहा हजार तरुणांना अन्नछत्राचा लाभ

दहा हजार तरुणांना अन्नछत्राचा लाभ

Published on

96097
गोवा ः येथे सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणाईसाठी व्हाईट आर्मीच्या वतीने मोफत अन्नछत्राचा उपक्रम राबविण्यात आला.
.....
दहा हजार तरुणांना अन्नछत्राचा लाभ

गोव्यातील सैन्य भरतीवेळी व्हाईट आर्मीकडून मोफत सेवा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः गोवा येथे झालेल्या सैन्य भरतीवेळी येथील व्हाईट आर्मीच्या स्वयंसेवकांनी मोफत अन्नछत्राचा उपक्रम राबविला. दहा हजारहून अधिक तरुणांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. २५ जून ते पाच जुलै या कालावधीत हा उपक्रम झाला. भरतीसाठी सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांसह गोवा, गुजरात आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते.
दररोज एक हजार ते पंधराशे तरुणांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. भरती प्रक्रियेवेळी कोणालाही कोणताही आरोग्यविषयक त्रास होऊ नये, यासाठी सकस आहार देण्यात आला. गेली १७ वर्षे इंडियन आर्मी व इंडियन एअर फोर्स यांच्याकडून होणाऱ्या भरती प्रक्रियेवेळी सन्मानाने व्हाईट आर्मीला अन्नछत्रासाठी विनंती केली जाते. आजअखेर विविध ठिकाणी भरतीसाठी आलेल्या साडेसहा लाखांहून अधिक तरुणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. त्यासाठी कर्नल आकाश मिश्रा, संजय कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य मिळाले.
व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे, उज्ज्वल नागेशकर, डॉ. अशोक डोनर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत शेंडे यांच्या नेतृत्वाखाली अमृता गावडे, भारती ठोंबरे, संचिता बाबर, निर्मला थापा, श्रद्धा पाटील, अनिता बागडी, श्रेया पाटणकर, सानिका कोळी, सिद्धीका माने, शैलेश रावण, योगेश सुतार, आदित्य सनगरे, प्रथमेश भोसले, प्रथमेश कांबळे, समर्थ अष्टगी, संमेश बागडेकर, शेखर वर्धन आदींनी संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.