हा तर कष्टकऱ्यांच्या चळवळीचा सन्मान

हा तर कष्टकऱ्यांच्या चळवळीचा सन्मान

Published on

96111
गडहिंग्लज ः ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ पुस्तकाचे लेखक संपत देसाई यांच्या सत्कारप्रसंगी गोपाळराव पाटील, अंजना रेडेकर, सुनील शिंत्रे, अमर चव्हाण, विद्याधर गुरबे, रियाज शमनजी आदी उपस्थित होते.
...
हा तर कष्टकऱ्यांच्या चळवळीचा सन्मान

डॉ. देसाई ः पुस्तकाचा विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेशाबद्दल सत्कार

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : ‘शिवाजी विद्यापीठाकडून ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ या माझ्या पुस्तकाचा झालेला सन्मान हा आजरा व परिसरातील कष्टकऱ्यांच्या चळवळीचा सन्मान आहे. एखाद्या चळवळीवर पुस्तक लिहिणे आणि ते विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात येणे हे निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे विद्यार्थ्यांकडून एक चळवळ अभ्यासली जाईल,’ असे मत पुस्तकाचे लेखक कॉ. संपतराव देसाई यांनी व्यक्त केले.
श्रमिक मुक्ती दलाचे राज्य निमंत्रक कॉ. संपत देसाई यांनी लिहिलेल्या ''एका लोकलढ्याची यशोगाथा'' या पुस्तकाचा समावेश शिवाजी विद्यापीठाने बी.ए. भाग-३ च्या मराठी अभ्यासक्रमात केला आहे. त्यानिमित्त देसाई यांचा येथे सत्कार झाला. शासकीय विश्रामगृहात कार्यक्रम झाला. ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, ‘या पुस्तकाचे लेखक संपत देसाई हे वर्गमित्र असून, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला याचा आनंद आहे.’
माजी सभापती अमर चव्हाण म्हणाले, ‘चळवळीत कार्यकर्ते काम करत असताना लिहिणं ही कला खूप कमी लोकांना अवगत असते आणि ती देसाई यांनी जपली आहे. जे काम अक्षरात येते ते कायमस्वरूपी टिकते.’ यावेळी गोपाळराव पाटील, अंजना रेडेकर, विद्याधर गुरबे, नितीन पाटील, शिवप्रसाद तेली, संजय तर्डेकर, रियाज शमनजी, राजू रेडेकर, युवराज पोवार, प्रशांत देसाई, शिवाजी माने उपस्थित होते.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.