पोषण आहार संघटनेतर्फे उपोषण सुरू

पोषण आहार संघटनेतर्फे उपोषण सुरू

Published on

ich101.jpg
96143
इचलकरंजी : प्रांत कार्यालयासमोर महिलाकडून बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.

पोषण आहार संघटनेतर्फे उपोषण सुरू
महापालिका शाळांत केंद्रीय किचन पद्धती न आणण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० : शाळांमध्ये केंद्रीय किचन पद्धतीमुळे सुमारे पाचशे महिला बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे इचलकरंजी महापालिका शाळांमध्ये केंद्रीय किचन पद्धती आणू नये, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेतर्फे प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
शालेय पोषण आहार योजनेच्या मूळ धोरणामध्ये गरीब, विधवा, अल्पसंख्याक, दलित, अविवाहित, परित्यक्ता महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते. यास हरताळ फासून मोठ्या कंपन्यांना केंद्रीय किचन पद्धतीचा ठेका देण्याचे धोरण घेतले जाते आहे. त्यामुळे एकवीस वर्षांपासून काम करीत असलेल्या सर्वसामान्य महिलांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सध्या काम करीत असलेल्या महिलांना आहे. तेथे कायमस्वरूपी काम द्यावे, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. आंदोलनात प्रा. ए. बी. पाटील आदी सहभागी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.