प्लास्टिक बंदी

प्लास्टिक बंदी

Published on

96237
...
लक्ष्मीपुरीत प्लास्टिकचा
७०० किलोचा साठा जप्त

दोन व्यापाऱ्यांना दहा हजारांचा दंड

कोल्हापूर, ता. १० : महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष्मीपुरी परिसरात बंदी असलेल्या प्लास्टिकचा साठा असलेल्या दोन व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड केला. पूजा प्लास्टिक व पटेल ट्रेडर्सकडे बंदी असलेल्या प्लास्टिकचा ७०० किलोचा साठा जप्त करण्यात आला.
आरोग्य निरीक्षक व कर्मचाऱ्यांमार्फत दररोज विविध भागांत तपासणी मोहीम हाती घेऊन कारवाई करण्यात येत आहे. सहायक आयुक्त कृष्णा पाटील, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, करण लाटवडे, सुशांत कावडे, सुशांत कांबळे, माधवी मसुरकर, शुभांगी पवार आदींनी ही कारवाई केली. बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास आस्थापना, संस्था व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्लास्टिकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.