अनिल कवडेंची बैठक रद्द, साताऱ्यात होणार

अनिल कवडेंची बैठक रद्द, साताऱ्यात होणार

Published on

अनिल कवडे
यांची बैठक
आता साताऱ्यात

कोल्हापूर : सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांची उद्याची (ता. ११) कोल्हापुरात होणारी बैठक रद्द झाली आहे. येथे होणाऱ्या बैठकीचे आयोजन आता सातारा येथे केले आहे. यासाठी कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील उपनिबंधकांना बोलविले आहे. या बैठकीत ते पावसाळ्यात रद्द केलेल्या निवडणुकांची माहिती घेणार आहेत. अद्याप किती सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यांचे कार्यक्रम कोणत्या टप्प्यावर आहेत, याचा आढावा ते घेणार आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणुकांमुळे काही संस्थांची निवडणूक स्थगित केली होती. त्यानंतर पुन्हा परवानगी दिली. मात्र, पुन्हा केवळ १७ दिवसांत अटी घालून निवडणुका स्थगित केल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.