ऋतुराज पाटील निवेदन बातमी

ऋतुराज पाटील निवेदन बातमी

Published on

फोटो 96263

‘लाडकी बहीण’ची नोंदणी सुलभ करा
आमदार ऋतुराज पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना दिले.
निवेदनातील माहितीनुसार, योजनेची कागदपत्रे किंवा फोटो अपलोड करताना पाच एमबीपर्यंत साईज बंधनकार असून, ती वाढवणे आवश्यक आहे. लाभार्थीचा प्रत्यक्ष फोटोऐवजी हार्डकॉपी फोटो अपलोड करण्याची सुविधा द्यावी. सध्या नारीशक्ती दूत या ॲपवर एकाच वेळी हजारो लोक नोंदणी करत असल्याने फॉर्म भरण्याचा वेग खूप कमी आहे. अगदी पहाटे किंवा मध्यरात्रीही साधारणपणे एक फॉर्म भरण्यास २५ ते ३० मिनिटांचा कालावधी लागतो. हा वेळ कमी होण्यासाठी उपाययोजना करावी. बऱ्याच ठिकाणी पहाटे फॉर्म भरले जात असल्याने भल्या पहाटे फॉर्म भरण्यासाठी सेतू सुविधा केंद्रांवर महिलांच्या रांगा लागत आहेत. महिला भगिनींना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी ‘नारीशक्ती दूत’ ॲप बरोबरच कॉम्प्युटरच्या मदतीने फॉर्म भरता येईल, अशी सुविधा देण्यात यावी. आमदार पाटील यांनी याबाबत योजनेचे नोडल अधिकारी सुहास वाईंगडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. शासनाची ही योजना जास्तीत जास्त लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. प्रशासनाने सहकार्य करावे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.