राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत समर्थ म्हाकवेला सुवर्ण

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत समर्थ म्हाकवेला सुवर्ण

Published on

समर्थ म्हाकवेचा फोटो...
५ जुलैच्या टुडे ८ वरील फोटो घेणे...
...
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत
समर्थ म्हाकवेला ‘सुवर्ण’

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः उत्तराखंड येथे झालेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मूळचा पट्टणकोडोलीचा व सध्या राष्ट्रीय खेल प्राधिकरणच्या कांदिवली (मुंबई) केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या समर्थ म्हाकवेने हरियानाच्या प्रवीण दिल्ली याच्यावर आठ विरुद्ध शून्य अशी मात करीत सुवर्णपदक पटकावले.
स्पर्धेत समर्थने पहिल्या लढतीत तेलंगणाच्या प्रदीपला नमवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत उत्तरप्रदेशच्या हरिओमचा तांत्रिक गुणांवर पराभव केला. उपांत्यपूर्व लढतीत हरियानाच्या प्रवीणवर आठ विरुद्ध शून्य गुणांनी मात केली. उपांत्य फेरीत एसएसईबीच्या आकाश कुमारवर आठ विरुद्ध शून्य गुण मिळवून मात करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत त्याने हरियानाच्या प्रवीण दिल्लीचा आठ विरुद्ध शून्य अशा तांत्रिक गुणांवर पराभव करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या कामगिरीवर त्याची जॉर्डन येथे होणाऱ्या विश्‍चचषक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड होण्याची शक्यता आहे. त्याला साई केंद्राचे प्रमुख प्रशिक्षक अमोल यादव, क्षेत्रिय संचालक पांडुरंग चाटे, सहायक संचालक अजिंक्य करपे यांचे मार्गदर्शन लाभले.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.