लाडकी बहिण योजना आढावा बैठक बातमी

लाडकी बहिण योजना आढावा बैठक बातमी

Published on

फोटो - 96284

पात्र महिला लाभार्थ्यांना वंचित राहू देऊ नका
जिल्हाधिकारी अमोल येडगे : लाडकी बहीण योजनेबाबत आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद असून, ऑनलाईन स्वरूपात आतापर्यंत २९ हजार ५४७ अर्ज, तर ऑफलाईन पद्धतीने ८८ हजार ४७० महिलांनी सहभाग घेतला आहे. जास्तीत जास्त महिलांची ऑनलाईन नोंदणी करावी. पात्र महिला लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नयेत याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव अमोल येडगे यांनी दिल्या. या योजनेबाबतची आढावा बैठक सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
यावेळी गावनिहाय माहिती सादर केली. सर्वांत जास्त अर्ज प्राप्त झालेली गावे, सर्वांत कमी अर्ज प्राप्त झालेली गावे, शहर भागात सर्वांत जास्त अर्ज प्राप्त झालेले वॉर्ड व सर्वांत कमी अर्ज प्राप्त झालेले वॉर्ड याप्रमाणे तपशील सादर केला. आता ऑफलाईन अर्जावरील फोटोवरून अर्जदार महिलेचा फोटो अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व्हरमधे वाढ केल्याने अर्ज भरण्यास गती मिळत आहे. सायंकाळी विशेष यंत्रणेद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे १० दिवसांत सर्व ऑफलाईन अर्ज घेण्याचे काम संपवून आलेले अर्ज तत्काळ ऑनलाईन करा, याबाबतच्या सूचना बैठकीत दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा सहआयुक्त नगर प्रशासन नागेंद्र मुतकेकर, उपायुक्त पंडित पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी निपसे राहुल, महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे उपस्थित होते.

चौकट
चांगले काम केलेल्या गावांचा होणार सन्मान
या योजनेत जी गावे संपूर्ण उद्दिष्ट वेळेत पूर्ण करतील, त्या गावांचा, वॉर्डचा आणि अर्ज नोंदणीत काम केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांचा सन्मान प्रशासनामार्फत केला जाणार आहे. अर्ज ऑनलाईन केलेल्या कर्मचाऱ्यांना मानधनही दिले जाणार आहे. ज्या गावात आणि वॉर्डमध्ये चांगल्या प्रकारे काम झाले आहे तेथील यशस्वी गाथा इतर गावांत राबवून योजनेला गती द्या, नावीन्यपूर्ण योजना राबवून जास्तीत जास्त लाभार्थी नोंदणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी यावेळी प्रत्येक गावनिहाय आढावा दैनंदिन स्वरूपात घेण्याच्या सूचना केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.