विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रांची पाहणी

विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रांची पाहणी

Published on

chd111.jpg
96341
रामपूर ः तहसीलदार राजेश चव्हाण यांनी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत अधिकारी.
--------------------
विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रांची पाहणी
तहसीलदार राजेश चव्हाण ः आवश्यक सोयी-सुविधांची पूर्तता करणार
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ११ ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची पाहणी केली जात आहे. तहसीलदार राजेश चव्हाण यांनी आजपासून दौऱ्याला सुरुवात केली. माणगाव (ता. चंदगड) परिसरातील केंद्रांची पाहणी केली. तालुक्यातील दोनशे केंद्रांची पाहणी करून आवश्यक सोयी-सुविधांची पूर्तता केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदान केंद्रासाठी वापरण्यात येणाऱ्या खोल्या, वीजपुरवठा, अपंग मतदारांसाठी रॅम्पची सुविधा, रांगेतील मतदारांना सावलीची व्यवस्था, स्वच्छतागृह आदींबाबत माहिती घेतली. चंदगड तालुका डोंगराळ, दुर्गम असल्यामुळे एकाही मतदान केंद्रावर गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत असल्याचे तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले. गैरसोयी असतील तेथे निवडणूकीपूर्वी सर्व सोयींची पूर्तता करण्यात येणार आहे. महसूल विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांबरोबरच मंडल अधिकारी, तलाठी, पोलिसपाटील यांच्या उपस्थितीत ही पाहणी केली जात आहे. दोन दिवसांत दौरा पूर्ण केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.