चार ऑगस्ट रोजी होणार ‘बीसीए’ची सीईटी

चार ऑगस्ट रोजी होणार ‘बीसीए’ची सीईटी

Published on

चार ऑगस्टला होणार
‘बीसीए’ची सीईटी

कोल्हापूर ः बीसीए., बीबीए., बीएमएस., एमसीए आणि एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) ४ ऑगस्टला विविध केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याबाबत ई-मेल, एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलने परिपत्रकाद्वारे दिली आहे. सीईटी सेलतर्फे २९ मे रोजी सीईटी परीक्षा घेतली. ही परीक्षा ४८ हजार विद्यार्थ्यांनी दिली. राज्यामध्ये १ लाख ८ हजार ७४१ इतक्या जागा असताना त्याच्या तुलनेत ४० टक्के जागा भरल्या जातील इतक्याच उमेदवारींनी परीक्षा दिली. त्यामुळे उर्वरित ६० टक्के जागा रिक्त राहण्याची भीती महाविद्यालयांनी व्यक्त केली. त्यासह अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याचे दिसले. त्यावर विद्यार्थी हितासाठी शासनाने बीसीए., बीबीए आदी अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त सीईटी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.