कोल्हापुरातील ४० विद्यार्थी बनले ‘सीए’ अंजलीचे

कोल्हापुरातील ४० विद्यार्थी बनले ‘सीए’ अंजलीचे

Published on

96475
सौरभ पाटील, आदिती पिसे, ओंकार चव्हाण, ऋग्वेद कपडेकर, स्नेहल घोरपडे, जय करोशी
......
कोल्हापुरातील ४० विद्यार्थी बनले ‘सीए’

विभागात सौरभ पाटील प्रथम; यशस्वितांमध्ये २२ मुले, १८ मुली

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः चार्टर्ड अकौंटंट (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यात कोल्हापुरातील ४० विद्यार्थ्यांनी यश मिळविले. कोल्हापूर विभागात सौरभ कुंडलिक पाटील याने प्रथम क्रमांक पटकवला. अदिती विनायक पिसे हिने दुसरा, ओंकार अनिल चव्हाण याने तिसरा, ऋग्वेद अभिजित कपडेकर याने चौथा आणि स्नेहल दीपक घोरपडे हिने पाचवा क्रमांक मिळविला.
मे महिन्यात घेण्यात आलेली ‘सीए’ परीक्षा कोल्हापुरातील ३२५ विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी ४० जणांनी यश मिळविले. त्यात २२ मुले, तर १८ मुलींचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का किरण चौगुले, ऋतुजा अनिल चौगुले, विक्रम तुकाराम पाटील, प्रथमेश संजय सातोस्कर, पिंकी सुनील वाधवाणी, इम्रान मौला पठाण, अदिती उद्धव संकपाळ, सोनाली दिलीप जाधव, साक्षी सूर्यकांत माने, प्रियांका भीमराव कदम, प्रणव मकरंद कुलकर्णी, भावेश प्रभुलाल पटेल, तेजस विजय खाडे, अक्षय जयसिंग पाटील, श्रुती उमेश गायकवाड, श्रेया मनोज अडके, प्रतिभा योगेश नाळे, उमरावती जक्काप्पा पाटील, आशीर्वाद अनंत कुलकर्णी, मृणाल किरण तेलंग, अवधूत आनंद नार्वेकर, मुक्तेश्वरी सिद्धेश्वर शिंदे, तेजस किरण गांधी, अनिकेत विद्याधर शेंडुरे, स्वरूप सुभाष पाटील, रोहित रमेश पाटील, युवराज हंबीरराव सावंत-पाटील, शिवानी नरेंद्र कुलकर्णी, सृष्टी संजीव भोसले, मानसी यशवंत पाटील, निखिल जिनेंद्र डोर्ले, सोपान चंद्रशेखर सावंत, अश्विन भरत पटेल, यशपाल सर्जेराव पाटील, अक्षय ताडे यांचा समावेश आहे.
........
जय करोशी देशात ४९ वा
इंटरमेडिएट (द्वितीय वर्ष) अभ्यासक्रमाचाही निकाल जाहीर झाला. त्यामध्ये जाधववाडी येथील जय संजीव करोशी याने ६०० पैकी ४६० गुणांची कमाई करत कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक आणि देशात ४९ वा क्रमांक मिळविला. जय सध्या विवेकानंद महाविद्यालयात बी. कॉम.च्या पहिल्या वर्षात शिकत आहे. इंटरमेडिएटमध्ये चांगले यश मिळाल्याचा आनंद असून, अंतिम परीक्षेतही धवल यश मिळविण्याचे ध्येय असल्याचे त्याने सांगितले.
......
कोट...
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सीए अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. इंटरमेडिएट अभ्यासक्रमाच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे.
- तस्लीमआरिफ मुल्लाणी, अध्यक्ष, आयसीएआय कोल्हापूर
......
अंजलीचे आई-वडिलांच्या पावलावर पाऊल
आरे (ता. करवीर) येथील सचिंद्र आणि अनुजा दैने दोघेही सीए आहेत. ते नायझेरियामध्ये कार्यरत आहेत. त्यांची कन्या अंजली आई-वडिलांचा आदर्श घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकत सीए उत्तीर्ण झाली आहे. अभ्यासक्रमाच्या नियमित कालावधीमध्ये तिने यश मिळविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.