आंतरभारती संस्थेत गुणवंतांचा सत्कार

आंतरभारती संस्थेत गुणवंतांचा सत्कार

Published on

आंतरभारती संस्थेत 
गुणवंतांचा सत्कार 
कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण मंडळाने शिक्षण क्षेत्रात पावित्र्य जपले आहे. त्याचबरोबर संस्थेने साने गुरुजींचे संस्कारशील विचार जपले आहेत; असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश प्रसाद देशपांडे यांनी केले. ते आंतरभारती संस्थेच्या तीन माध्यमिक शाळांतील दहावी, एन.एम.एम.एस, सारथी परीक्षा, स्कॉलरशीप पात्र विद्यार्थ्यांचा सत्कारप्रसंगी बोलत होते. यावेळी कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावंकर, उपाध्यक्ष जिनरत्न रोटे उपस्थित होते. यावेळी ‘आंतरभारती’चे सचिव मारुतराव पाटोळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय भरत अलगौंडर यांनी करून दिला. प्राथमिक विभागाच्या सचिव संध्या वाणी यांनी आभार मानले. यावेळी विधी सेवाचे अधीक्षक राजेंद्र सोनुले, बी. बी. मगदूम, नेहा कानकेकर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रिया जाधव व रोहिणी फाले यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.