शामराव कुलकर्णी यांना ‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार जाहीर
ich111.jpg 96321 ( फोटो ओव्हरसेट)
96321
लोकमान्य टिळक पुरस्कार
शामराव कुलकर्णी यांना जाहीर
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १३ ः येथील ब्राह्मण सभेतर्फे प्रतिवर्षी १ ऑगस्टला दिला जाणारा मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार यावर्षी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल कामगार नेते अशोक ऊर्फ शामराव कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. प्रणव हरिदास (कला), डॉ. आनंद दिवाण (वैद्यकीय), डॉ. पल्लवी चिंचोळकर (शैक्षणिक), ब्रह्मचारिणा कु. मंदा नवरे (आध्यात्मिक) यांना ‘श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार’ या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. वेदसम्राट स्व. सखाराम महेश्वर पाध्ये गुरुजी यांच्या स्मरणार्थ वेदोनारायण पुरस्कार रामचंद्र मुंडले (तेंडोली ता. कुडाळ) यांना प्रदान करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अध्यक्ष सुरेश ऊर्फ बंडा जोशी यांनी दिली.
येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे १ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजता वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथि म्हणून डॉ. अनिल देशपांडे (आजरा) उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान सुरेश मुळे (जालना) भूषविणार आहेत. श्रीमंत यशवंतराव घोरपडे (सरकार) यांची विशेष उपस्थिती आहे. यानिमित्ताने समाजातील इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वी मध्ये ८० टक्के गुणप्राप्त विद्यार्थी, तसेच इयत्ता ५ वी व ८ वी एनएमएमएस व एनटीएस, एमटीएस, नेट-सेट, युपीएससी, स्कॉलरशिप तसेच कला, क्रीडा, आरोग्य व आध्यात्मिक, योग क्षेत्रात राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर विशेष पुरस्कार मिळवलेल्या गुणीजनांचा गौरव करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.