चिपडे सराफांचा ऑर्डर फेस्टीव्हल

चिपडे सराफांचा ऑर्डर फेस्टीव्हल

Published on

03633
चिपडे सराफ पेढी

‘चिपडे सराफ’मध्ये
ऑर्डर फेस्टिव्हल
कोल्हापूर, ता. १० : व्हीनस कॉर्नरवरील नवा सोनेरी लँडमार्क म्हणून परिचित असलेल्या गोपीनाथ अनंत चिपडे सराफांचा ऑर्डर फेस्टिव्हल सुरू झाला. ऑर्डरच्या दागिन्यांच्या मजुरीत २० टक्के डिस्काउंट मिळेल, अशी माहिती पेढीचे ज्येष्ठ संचालक बन्सीधर चिपडे आणि मुरलीधर चिपडे यांनी दिली.
१२१ वर्षांची सुवर्ण परंपरा जपणारे आणि खास करून डिझायनर दागिन्यांसाठी चिपडे सराफ प्रसिद्ध आहेत. शतकापूर्वीच्या दागिन्यांचे साचे आणि नमुने आजही चिपडे परिवाराने जतन केले आहेत. त्यामुळे अस्सल महाराष्ट्रीयन दागिने, अँटिक, टेम्पल दागिन्यांची मोठी व्हरायटी पेढीवर कायम उपलब्ध असते म्हणूनच चोखंदळ ग्राहकांची पहिली पसंती चिपडे सराफी पेढीला असते. दागिने खरेदी करताना स्त्रियांच्या मनातला दागिना जसाच्या तसा त्यांना मिळावा, या उद्देशाने हा ऑर्डर फेस्टिव्हल जाहीर केल्याचे सांगितले.
पेढीच्या व्हीनस कॉर्नर आणि भाऊसिंगजी रोड या दोन्ही शोरूममध्ये सुरू असलेल्या या महोत्सवात २२ कॅरेटचे सर्व प्रकारचे दागिने ऑर्डरनुसार बनवून मिळणार आहेत. यात बुगडीपासून ते कानातले, अंगठ्या आदी छोट्या दागिन्यांपासून ते मंगळसूत्र, बिलवर पाटल्या, गोठ, साज, टेम्पल नेकलेस, चोकर आदी दागिन्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे डिझाइन असेल त्यानुसारही दागिने बनवून मिळणार आहेत. सध्या सोन्याचे भाव कमी झाले आहेत. जोडीला मजुरीत सूट मिळणार असल्याने मोठे दागिने करण्यासाठी ही सुवर्णसंधी ठरणार असल्याने ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पेढीचे युवा संचालक तुषार चिपडे, सिद्धांत चिपडे आणि पुष्कराज चिपडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com