

फाईल फोटो
...
सिक्युरिटी जवानांची ‘सुरक्षा’ वाऱ्यावर
‘सायबर’च्या ओंकार कुर्लेचे सर्वेक्षण ः १२ तासांच्या ड्यूटीसोबत अपुरे वेतन
नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः शिक्षण कमी, वाढलेली बेरोजगारी आणि कौशल्याची कमी यामुळे अनेकजण सिक्युरिटी जवान म्हणून विविध कार्यालयांत ड्यूटी करतात. पूर्वी हे काम करणारे माजी सैनिक अधिक प्रमाणात होते, मात्र या क्षेत्रातील वाढलेली मागणी पाहता इतरांनाही या कामात सामावून घेतले जाऊ लागले, मात्र कार्यालयाची सुरक्षा करता करता त्यांचीच ‘सुरक्षा’ वाऱ्यावर असल्याचे सध्या चित्र आहे. याबाबतचे सर्वेक्षण सायबर महाविद्यालयाच्या समाजकार्य विभागातील ओंकार कुर्ले या विद्यार्थ्याने केले आहे. यामध्ये काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.
एखादी संस्था, कार्यालयाच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमले जातात, मात्र त्यांची नेमणूक करताना एजन्सीमार्फत केली जाते. परिणामी, सुरक्षारक्षकांच्या वेतनातील ठराविक रक्कम ही एजन्सीला कमिशन म्हणून दिली जाते. उर्वरित तुटपुंजी म्हणजेच सात ते दहा हजार रुपयांपर्यंतच वेतन मिळते. बऱ्याचवेळी अधिक वेतन हातात यावे, यासाठी हे सुरक्षारक्षक ‘जादा ड्यूटी’ करतात. परिणामी, संस्थेकडून त्यांची पिळवणूकच होते. आठ तासांचे काम बारा तास लावले जाते. शिवाय तीन शिफ्टमध्ये चालणारे काम फक्त दोन शिफ्टमध्ये चालते. एका कामगाराचा पगार वाचतो. यामुळे बऱ्याच ठिकाणी सुरक्षारक्षक बारा तास ड्यूटी करतात. एखादा सहकारी आजारी असल्यास सलग दोन दिवसही ड्यूटी करावी लागते. अशावेळी खाण्याची आबाळ होते. याचा थेट परिणाम त्या सुरक्षारक्षकाच्या आरोग्यावर, मानसिकतेवर होतो, असे निष्कर्ष ओंकार कुर्ले याने अभ्यासातून स्पष्ट केले आहेत. यासाठी त्याला सायबर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील डॉ. डी. एन. वळवी, डॉ. दीपक भोसले, डॉ. सोनिया रजपूत, डॉ. कालिंदी रणभरे, डॉ. आपटे, सायबरचे संचालक डॉ. रथ, सचिव डॉ. रणजित शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले.
...
अभ्यासातील निष्कर्ष असे ः (सरासरीमध्ये)
- वयोगट - ४१ ते ५० यातील ४२ टक्के
- बारावीपर्यंत शिक्षण झालेले सुरक्षारक्षक ३२ टक्के
- ड्यूटीची वेळ - आठ ते बारा तास ८८ टक्के
- तणाव ८२ टक्के
- वेतन ७ ते १० हजारपर्यंत.
...
सुरक्षारक्षक या आजारांनी बेजार
केबिनमध्ये बसण्याची व्यवस्था चांगली नसल्याने सिक्युरिटी गार्डना पाठीचा आजार, मणक्याचा आजार असे वेगवेगळे आजार निर्माण हाोतात. त्यांना बसण्यासाठीच्या खुर्च्या व्यवस्थित नसल्याने सोबत कपाट, फॅन, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे अशा कारणांमुळे गैरसोय सहन करावी लागते. कार्यालयात कोण व्यक्ती येतात, याची नोंद ठेवण्यापासून ते सतत पहारा ठेवणे अशी कामे त्यांना करावी लागतात.
कोट
‘कोल्हापूर शहरातील एकूण ५० महाविद्यालयांतील १०३ सिक्युरिटी गार्ड यांचा अभ्यास केलेला आहे. यातून हे निष्कर्ष शोधले गेलेले आहेत.’
- ओंकार कुर्ले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.