सिद्धार्थचा दीडकोटी ते सव्वीस लाखांपर्यंतचा प्रवास
लोगो ः कबड्डीला आले,
चांगले दिवस ः उत्तरार्ध
चंदगडच्या ‘बाहुबली’चा प्रो- कबड्डीत बोलबाला
मानधनात कोटींची उड्डाणे; बेंगॉल वारियर्सकडून सर्वाधिक दहाजणांना संधी
सकाळ वृत्तसेवा, सचिन भोसले
कोल्हापूर, ता. २७ ः ‘बाहुबली’ या टोपणनावाने चंदगडच्या सिद्धार्थ देसाईने प्रो-कबड्डीचे सहा हंगाम गाजविले. त्याने पहिल्या हंगामात एक कोटी पंचेचाळीस लाखांचे, तर यंदा सव्वीस लाखांचे मानधन घेतले. खेळातून कमाई आणि खेळात सर्वाधिक छापा मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. तर यंदाच्या प्रो-कबड्डीच्या हंगामात सर्वाधिक मराठी खेळाडूंना स्थान देणारे बेंगॉल वॉरियर्सचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून रत्नागिरीचे प्रशांत सुर्वे यांचा बोलबाला महाराष्ट्रात होत आहे.
मूळचा हुंदळेवाडी (ता. चंदगड) चा असलेला सिद्धार्थ भाऊ राष्ट्रीय कबड्डीपटू सूरज देसाईचा खेळ आणि कबड्डीचा वारसा असलेल्या देसाई कुटुंबातील संस्कारांमुळे कबड्डीत आला. महाराष्ट्राकडून राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला यू मुंबा प्रो-कबड्डी संघाकडून २०१८ ला संधी मिळाली. त्यानंतर २०१९ मध्ये तेलगू टायटन्सचे प्रतिनिधीत्व केले. २०२३ पासून तो हरियाणा स्टीलर्स संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. त्याने यापूर्वी एअर इंडिया, महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याला सिझन सातमध्ये तेलगू टायटन्सने १ कोटी ४५ लाख बोलीने त्याची सेवा सुरक्षित केली होती. त्यानंतर त्याने ५० लाख, त्यानंतर एक कोटी, पुन्हा एक कोटी आणि आता २६ लाख रुपयांचे पॅकेज मिळवले आहे. खेळातून इतके अर्थार्जन करता येते. याचे उदाहरण म्हणून त्याच्याकडे केवळ राज्यातील कबड्डी नव्हे तर संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. (उत्तरार्ध)
-----------
एकवीस सामन्यांत
२१८ छापे गुणांची कमाई
प्रो-कबड्डीत यू-मुंबाकडून प्रतिनिधीत्व करताना त्याने २१ सामन्यांत २१८ ‘रेड पॉईंट'' (छापे गुण) इतके सर्वाधिक जलद गुण पटकाविणारा तो खेळाडू ठरला. त्याच्या नावावर ८९ टक्के इतका ‘स्ट्राईक रेट'' नावावर नोद आहे.
-----------
मराठी कबड्डीपटूंचा आधार प्रशांत सुर्वे
मूळचे रत्नागिरीचे पण नोकरीनिमित्त युनियन बँकेत सेवेत असलेले प्रशांत सुर्वे यंदाच्या हंगामात बेंगॉली वॉरियर्सचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील मयूर कदम (रायगड), प्रणय राणे (मुंबई सिटी), वैभव गर्जे (बीड), आकाश चव्हाण (विदर्भ), आदित्य शिंदे (रत्नागिरी), दीपक शिंदे (पुणे), श्रेयस उमरदंड (नंदूरबार), रुद्र गर्जे (बीड) मराठी मुलांना आपल्या संघात स्थान दिले आहे. तर अभिषेक बच्चन मुंबईचा पण त्याच्या जयपूर पिंक संघात एकही मुंबईकर किंवा महाराष्ट्रीयन खेळाडूचा समावेश नाही. विविध संघात हरियाणाचे १०६ , तर महाराष्ट्राचे ३९ , तामिळनाडूचे २२, त्याखालोखाल उत्तरप्रदेशच्या मुलांचा समावेश आहे.
---------
कोट
हरियाणाचे कुस्तीप्रमाणे सैन्यदल, दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब आदी संघातून खेळाडू प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यामुळे प्रो-कबड्डीसह राष्ट्रीय संघात त्यांचेच खेळाडू अधिक आहेत. महाराष्ट्राच्या मुलांना संधी आहे. पण त्यांना आपले गाव, शहर सोडण्याची इच्छा नाही. त्यामुळे आपली मुले कबड्डीतील उजवे असतानाही मागे पडत आहेत.
- दीपक पाटील, राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक, प्रो-कबड्डी संघाचे मालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

