मालिका भाग ३

मालिका भाग ३

Published on

रखडलेली रोषणाई : भाग २ - लोगो
...
07225, 07407
...

खांब बसवण्यापूर्वीच फाउंडेशन खराब
नकाशाविना केल्याने एका रेषेत नसल्याचा आक्षेप

कोल्हापूर, ता. २७ ः देशभरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराकडे जाताना भाविकांना तीर्थक्षेत्री आल्याचे समाधान लाभण्यासाठी परिसरातील रस्त्यांवर साउंड सिस्टीमसह हेरिटेज लूकचे खांब व दिवे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठीची वर्कऑर्डर देऊन आठ महिने झाले आहेत. अजून खांब बसवण्यापूर्वीच सध्या अनेक फाउंडेशन खराब होत आहेत. नकाशाच तयार नसताना फाउंडेशन केल्याने अनेक ठिकाणी ते एका रेषेत नाहीत.
अंबाबाई मंदिराकडे येण्यासाठी भाविकांसाठी विविध मार्ग आहेत. दसरा चौक, सीपीआरकडून, बिंदू चौकाकडून येणाऱ्या रस्त्यावर हेरिटेज स्ट्रीटमधून दिवे लावले जाणार आहेत. त्याशिवाय मिरजकर तिकटी, शाहू खासबाग मैदान, बिंदू चौक ते भवानी मंडप, ताराबाई रोड या मार्गावरूनही भाविक मंदिराकडे जातात. त्यामुळे मंदिराच्या भोवतीच्या रस्त्यांवरही हेरिटेज लूक असलेले खांब व दिवे बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये त्याची वर्कऑर्डर देण्यात आली. त्यासाठी खांबांचे डिझाईन सांगितले होते, त्याप्रमाणे बनवले नसल्याने त्यात बदल करावे लागले होते. त्यानंतर खांबांचे अंतिम रूप निश्‍चित करण्यात आले. आता ते खांब बसवण्यासाठी किमान दीड महिना जाणार आहे; पण ते बसवण्यापूर्वी आताच फाउंडेशनचे बोल्ट कापले गेले आहेत, काही ठिकाणी वाकवले गेले आहेत. येत्या महिनाभरात त्याकडे लक्ष दिले नाही तर अनेक ठिकाणी बोल्ट गायब होऊन केवळ कॉंक्रिट शिल्लक राहण्याची शक्यता आहे. यामुळे ते करण्यासाठी पुन्हा नवीन खर्च होणार आहे. त्यासाठी कालावधीही जाणार आहे. अजून काही रस्त्यांवर फाउंडेशनही केलेले नाही. खांबांमधील साउंड सिस्टीम सुरू ठेवण्यासाठी आताच नियोजन केले पाहिजे; अन्यथा ती यंत्रणा बंदच राहण्याचा धोका आहे.
...
‘शहरात तीन वेगवेगळ्या कामातून बसवण्यात येणाऱ्या वीज दिव्यांच्या खांबांची डिझाईन एकसारखी असावी अशी अपेक्षा आहे. मात्र, त्यात फरक असल्याने समितीवर फरकासह मान्यता देण्याची वेळ आली आहे. अजूनही हेरिटेज स्ट्रीट तसेच मंदिर परिसरातील रस्त्यांवर कुठे खांब बसवायचे याचा नकाशा नसताना फाउंडेशन तयार करून ठेवली आहेत. अजूनही नकाशा नाही. तसचे एका रेषेत फाउंडेशन नाहीत. रंकाळा तलाव परिसरातही प्रथम काठावर खांब बसवण्याचा प्रस्ताव होता. तो बदलून पूर्वी ज्या ठिकाणी दिवे होते, तिथे दिवे बसवले जावेत, समान अंतर असावे असे सांगितले. चांगले काम व्हावे ही भावना असल्याने समितीची मान्यता नसताना केलेल्या कामाबाबत काही दुरुस्ती केल्यानंतर समितीचा त्यात दोष काय आहे?
- उदय गायकवाड, सदस्य, हेरिटेज समिती
...
या मार्गावर असतील हे खांब

मिरजकर तिकटी ते बिंदू चौक (एक दिवा)
बिंदू चौक ते भवानी मंडप (एक दिवा)
भवानी मंडप ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (दोन दिवे)
...

खांबांची संख्या
१२०
....
उंची
६ मीटर
.....
खर्च
२ कोटी ६१ लाख ४८ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com