अमेरिकेतील शिक्षणासाठी कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी पुढे यावे

अमेरिकेतील शिक्षणासाठी कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी पुढे यावे
Published on

07215

अमेरिकेत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे

कॉन्सुल जनरल माईक हँकी; शिवाजी विद्यापीठात साधला विद्यार्थ्यांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २७ ः ‘‘अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांना आधुनिक उच्च शिक्षणाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी कोल्हापूर परिसरातील विद्यार्थ्यांनी पुढे यावे,’’ असे आवाहन अमेरिकेचे मुंबईतील कॉन्सुल जनरल माईक हँकी यांनी येथे केले. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे उपस्थित होते.
अमेरिकी विद्यापीठे व शिक्षण संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि संगणकशास्त्र या शाखांपलीकडे मानव्यशास्त्र, विज्ञान आणि व्यवस्थापन इत्यादी विद्याशाखांतीलही आधुनिक उच्चशिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ भारतीय विद्यार्थ्यांनी घ्यावा. अमेरिकी विद्यापीठांसाठी भारतीय विद्यार्थी हे मोठी देणगीच आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा उभय देशांनाही भविष्यात मोठा लाभ झाल्याखेरीज राहत नाही. शिवाजी विद्यापीठासह कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील शिक्षण संधींचा लाभ घेण्याबाबत विचार करावा. त्यांना विद्यापीठ निवडीपासून ते प्रवेश प्रक्रिया, व्हिसा प्रक्रिया आदींसाठी कॉन्सुलेट सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही कॉन्सुल जनरल माईक हँकी यांनी दिली. कार्यक्रमात इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी विद्यापीठाची वाटचाल मांडली. यावेळी कॉन्सुलेटचे राजकीय व आर्थिक अधिकारी रॅन मुलेन, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, श्रीकृष्ण महाजन, महादेव देशमुख, बौद्धिक संपदा हक्क कक्ष आणि आंतरराष्ट्रीय संबंध कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी सादळे, डॉ. तृप्ती करेकट्टी उपस्थित होते.
.......
व्हिसा मागणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या
अमेरिकेचे भारताशी घट्ट राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बंध आहेत. अमेरिकेत उच्चशिक्षण घेण्यास पसंती दर्शविलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या चीनपाठोपाठ सर्वाधिक आहे. अमेरिकेकडे शैक्षणिक व्हिसा मागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे कॉन्सुल जनरल माईक हँकी यांनी सांगितले.
...........
अंबाबाईचे दर्शन
कॉन्सुल जनरल माईक हँकी यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. येथील विविध परंपरांची माहितीही त्यांनी जाणून घेतली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, त्यांनी फौंड्री उद्योगाची माहिती जाणून घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com