त्र्यंबोली टेकडीवर गर्दी

त्र्यंबोली टेकडीवर गर्दी

Published on

07353
...

‘त्र्यंबोली’स नैवेद्य देण्यासाठी
कोल्हापूरकरांची लगबग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः श्रावणातील चौथ्या मंगळवारनिमित्त त्र्यंबोली देवीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी रिमझिम पावसातही भाविकांनी गर्दी केली. आषाढ महिन्यात मासांहाराचा नैवेद्य, श्रावणात पुरणपोळीचा गोड नैवेद्य व नवरात्रीत देवीला तेल अर्पण करण्याची परंपरा आजही कोल्हापूरकरांनी जपली आहे. याच्याच माध्यमातून श्रावणातील मंगळवारी व शुक्रवारी देवीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी टेंबलाई टेकडीवर भाविकांची गर्दी होते. आजही भाविकांनी नैवेद्य देण्यासाठी हजेरी लावली.
श्रावणातल्या मंगळवारी व शुक्रवारी या दोन दिवशीच नैवेद्य अर्पण करण्यासाठी गर्दी न करता इतर सुटीच्या दिवशीही नैवेद्य अर्पण करा, असे आवाहन गुरव समाजाने केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच इतर दिवशी नैवेद्य व शिधा अर्पण करण्याला भाविकांनी प्राधान्य दिले. श्रावण चौथ्या मंगळवारनिमित्त श्री त्र्यंबोली देवीची अलंकारिक उभी पूजा प्रदीप गुरव, मधुकर गुरव, संतोष गुरव यांनी बांधली. सकाळी श्रीसुक्त महाअभिषेक झाला. त्यानंतर दिवसभर नैवेद्य स्वीकारण्याची लगबग सुरू राहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com