अकरा वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धा शुक्रवारपासून
अकरा, एकोणीस वर्षांखालील
बुद्धिबळ स्पर्धा ५ सप्टेंबरपासून
आठ फेऱ्यांत होणार; चेस असोसिएशनतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः चेस असोसिएशनतर्फे अकरा वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा ब्राह्मण सभा करवीर धाम येथे ३० ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. एकोणीस वर्षाखालील स्पर्धा ताराबाई पार्कातील मांगल्य मल्टीपर्पज हॉल येथे ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान आयोजित केल्या आहेत.
स्विस लीग पद्धतीने क्लासिकल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार एकूण आठ फेऱ्यांत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतून दोन मुला-मुलींची निवड हैदराबाद येथे ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय अकरा वर्षाखालील निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धेसाठी राज्य संघात निवड केली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. या व्यतिरिक्त सात ते नऊ वर्षांखालील मुला-मुलींनाही उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. ही स्पर्धा ॲड. पी. आर. मुंडरगी यांच्या स्मरणार्थ आयोजित केली आहे.
याशिवाय एकोणीस वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा पाच ते सात सप्टेंबरदरम्यान मांगल्य मल्टिपर्पज हॉलमध्ये होणार आहे. स्पर्धा आंतरराष्ट्रीय नियमानुसार घेतली जाणार आहे. या स्पर्धेतून चार मुली व सहा मुलांची हरियाणा येथे १६ ते २४ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय ज्युनिअर निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे, अशी माहिती चेस असोसिएशनचे अध्यक्ष भरत चौगुले यांनी दिली. पत्रकार परिषदेस मनीष मारूलकर, धीरज वैद्य, ब्राह्मण सभाए करवीरचे अध्यक्ष संतोष कोडोलीकर, कार्यवाह श्रीकांत लिमये, खजिनदार रामचंद्र टोपकर, सदस्य एन. ए. कुलकर्णी, अनिश गांधी, प्रशांत लिमये उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

