येई गणेशा

येई गणेशा

Published on

लोगो- येई गणेशा
...
07425
रेकॉर्डिंग स्टुडिओ गजबजले
महिला व मुलींच्या सुरक्षेवर होणार प्रबोधनाचा जागर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : गणेशोत्सवातील देखाव्यांच्या रेकॉर्डिंगची लगबग आता सुरू झाली आहे. स्टुडिओमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी वाढत असून, यंदा ऐतिहासिक देखाव्यांबरोबरच महिला व मुलींच्या सुरक्षेबाबतच्या प्रबोधनाचा जागर होणार आहे. शिवकालात महिला व मुलींवर अत्याचार झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिक्षा आणि सद्य:स्थिती, अशा अनुषंगाने देखाव्यांतून भाष्य होणार आहे.
शहर आणि परिसरातील आठ ते दहा स्टुडिओत देखाव्यांसाठीचे रेकॉर्डिंग होते. प्रत्येक वर्षी दहीहंडीनंतर कार्यकर्त्यांची वर्दळ वाढते. पण, यंदा आठवडाभर अगोदरपासून ही गर्दी वाढू लागली आहे. शहर आणि परिसरातील मंडळांचे सजीव देखावे दहा ते पंधरा मिनिटांचे तर ग्रामीण भागातील देखावे पस्तीस ते पंचेचाळीस मिनिटांचे असतात. हा ट्रेंड यंदाही कायम आहे. मंडळातीलच एखाद्या कार्यकर्त्यांने देखावा लिहायचा आणि सर्वसंमतीने त्यात काही बदल करून तो गणेशोत्सवात सादर करायचा, ही परंपराही काही मंडळांनी यंदाही जपली आहे. दरम्यान, देखाव्यांच्या रेकॉर्डिंगच्या निमित्ताने शहर आणि परिसरातील पाचशेंहून अधिक कलाकारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
...
नवरा-बायकोचे असेही भांडण
सीमाभागातील एका मंडळाच्या देखाव्याचे रेकॉर्डिंग नुकतेच एका स्टुडिओत झाले. नवरा मूळचा महाराष्ट्रातला आणि बायको मूळची कर्नाटकातली. या दोघांच्या भांडणाचा विषय असतो. महाराष्ट्रातील महिलांसाठीच्या योजना आणि कर्नाटकातील महिलांसाठीच्या योजना. दोघेही भांडत असतात आणि सरतेशेवटी ‘आळशी बनू नका. स्वतःच्या हिमतीवर स्वतःला सिध्द करा’ असा संदेश ही मंडळी देऊन जातात.
...

‘प्रत्येक वर्षीच्या तुलनेत यंदा मंडळांनी लवकर देखाव्यांची तयारी सुरू केली आहे. ऐतिहासिक देखाव्यांवर अजूनही भर असला तरी काही मंडळे वर्तमानातील विविध प्रश्नांचा वेध घेणारे देखावेही यंदा सादर करणार आहेत.
- उमेश नेरकर, लेखक व संगीतकार
...
‘कार्यकर्त्यांच्या डोक्यातील भन्नाट आयडिया, एखाद्या गोष्टींचे त्यांच्या नजरेतून त्यांनी केलेले विडंबन गणेशोत्सवातील देखाव्यांतून पुढे येत असते. त्यामुळे या देखाव्यांचे रेकॉर्डिंग म्हणजे आमच्यासाठीही काही तरी नवीन शिकणेच असते.
- सलीम फरास, राधाई रेकॉर्डिंग स्टुडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com