डॉ. पाटणकर

डॉ. पाटणकर
Published on

डॉ. भारत पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार ४ सप्टेंबरला
शरद पवार यांची उपस्थिती : गोपाळ गुरू, मनीषा गुप्ते प्रमुख वक्ते

कोल्हापूर, ता. २७ : गेली अनेक वर्षे प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढणारे डॉ. भारत पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार समारंभ ४ सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या हस्ते व खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला गोपाळ गुरू, मनीषा गुप्ते, वाहरू सोनवणे व डॉ. जयसिंगराव पवार हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कष्टकऱ्यांच्या चळवळीशी तत्त्‍वज्ञानाची जोड देत बळीराजा धरण, समन्यायी पाणी वाटपाची चळवळ, धरणग्रस्त, दुष्काळग्रस्तांची चळवळ उभी करणारे कुशल संघटक, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, बडवे उत्पात हटाव आंदोलन, विठोबा-रखुमाई मुक्ती आंदोलन, अंबाबाई मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून सांस्कृतिक भूमिका निश्‍चित करणारे विचारवंत अशी डॉ. पाटणकर यांची ओळख आहे. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा कार्यगौरव समारंभातून सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजिकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com