पंचगंगा नदीजवळ साडेतीन लाखांचे दागिणे चोरीस

पंचगंगा नदीजवळ साडेतीन लाखांचे दागिणे चोरीस

Published on

दोन महिलांचे साडेतीन लाखांचे दागिने चोरले
पंचगंगा नदी परिसरात प्रकार ः देवीच्या जग दर्शनासाठी गेल्यानंतर डल्ला

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः पंचगंगा नदी परिसरात सोमवारी रेणुका देवीच्या जग दर्शनासाठी गेलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने डल्ला मारला. दोघींचे मिळून सुमारे ६५ ग्रॅमचे सुमारे साडेतीन लाखांचे दागिने पळविले. सोमवारी दुपारी दीड ते पावणेतीनच्या सुमारास पंचगंगा नदी मार्गावरील जामदार क्लब येथे हा प्रकार झाला. याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मंगल दिलीप काळे (वय ६४, रा. मस्कुती तलाव अथर्व रेसिडेन्सी प्लॉट, शुक्रवार पेठ) व साक्षीदार शेवंती दिनकर माने (७७, रा. शुक्रवार पेठ) या सोमवारी रेणुकादेवीच्या जग दर्शनासाठी दुपारी पंचगंगा नदी मार्गावर गेल्या होत्या. साधारण दुपारी दीड ते पावणेतीनदरम्यान ‘त्या’ देवीच्या जगाचे दर्शन घेण्यासाठी थांबल्या होत्या. काळे या जामदार क्लबजवळ असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख दहा हजार रुपयांची वीस ग्रॅम वजनाची दोन पदरी रवी माठाची सोन्याची माळ पळविली. तसेच, साक्षीदार माने या देवीच्या जगाचे दर्शन घेण्यासाठी आखरी रस्ता बोर्डजवळ ज्ञानेश्‍वरी अपार्टमेंट यांच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दर्शन घेण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील दोन लाख ४७ हजार रुपयांची सुमारे ४५ ग्रॅमची तीन पदरी अष्टपैलू सोन्याचे मणी असलेला हार आणि त्याचा पाठीमागे सोन्याची साखळी असा एकूण साडेतीन लाख रुपयांचे दागिने पळविले. त्यांचे दागिने चोरीस गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली.
दरम्यान, गर्दीचा फायदा घेऊन हे कृत्य झाल्याचे दिसून येते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com