इचल : धनादेश रक्कम एका दिवसात जमा

इचल : धनादेश रक्कम एका दिवसात जमा
Published on

धनादेश भरलेल्या दिवशीच
मिळणार क्लिअरिंगची रक्कम

रिझर्व्ह बँकेचा निर्णय; व्‍यापारी वर्गाला फायदा

इचलकरंजी, ता. २७ : बँकेत समाशोधन (क्लिअरिंग) भरलेल्या धनादेशाची रक्कम एका दिवसात बँक खात्यावर जमा होणार आहे. यासाठी इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनने पाठपुरावा केला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे या विभागाचे अधिकारी विश्वजीत करंजकर यांनी याबाबत माहिती असोसिएशनला दिली. यामुळे व्यापारी वर्गाला चांगला फायदा होणार आहे.
याबाबत पाॅवरलूम विव्हर्स असोसिएशनकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा होत होती. तांत्रिक अडचणीवर चर्चाही झाली. अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ज्या दिवशी धनादेश समाशोधनासाठी बँकेत भरला जाईल, त्याच दिवशी सायंकाळी खात्यावर रक्कम जमा होईल. याबाबतची प्रक्रियाही निश्चीत केली आहे. यामध्ये प्रत्येक तासानंतर संबंधित बँकेकडे धनादेश पाठविले जातील. एक तासाच्या आत संबंधित बँकेने धनादेश पास करणे अथवा रिटर्न करणे बंधनकारक असेल. ही प्रक्रिया दुपारी ४ पर्यंत चालेल. सायंकाळी पाचला भरलेल्या धनादेशाची रक्कम जमा होईल.
पूर्वी समाशोधनसाठी भरलेल्या धनादेशाची रक्कम दुसऱ्या दिवशी सायंकाळी जमा व्‍हायची. त्यामुळे संबंधित रक्कम तिसऱ्या दिवशी व्यापारी, उद्योजकांना मिळायची. नवीन नियमामुळे त्याच दिवशीच रक्कम मिळेल. एनईएफटी, आरटीजीएस व आयएमपीएस प्रक्रियेव्दारे त्याच दिवशी धनादेश समाशोधनासाठी भरल्यानंतर मिळेल. यामुळे दररोज ७५ ते १०० कोटी अतिरिक्त उपलब्ध होतील. त्यामुळे उद्योजकांचे एका दिवसाचे कर्जावरील व्याजही वाचणार असल्याची माहिती उद्योग क्षेत्रातून देण्यात आली.
----------------
कोट
एक दिवसात समाशोधन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तांत्रिक अडचणी होत्या. त्याबाबत असोसिएशनतर्फे पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले. धनादेश भरलेल्या दिवशीच खात्यावर रक्कम जमा होणार असल्याने व्यापारी, उद्योजकांना फायदा होईल.
- चंद्रकांत पाटील, अध्यक्ष, दि इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com